देहलतील बॉम्बस्फोटाचे आश्‍चर्य वाटत नाही ! – इस्रायलचे भारतातील राजदूत

नवी देहली – वेगवेगळ्या देशांतील इस्रायली दूतावासांवर आक्रमणे केली जात आहेत. त्यामुळे देहलतील बॉम्बस्फोटाचे आश्‍चर्य वाटत नाही. इस्रायलच्या अन्वेषण यंत्रणा भारतीय यंत्रणांसमवेत मिळून स्फोटाचे अन्वेषण करत आहेत, असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.

मल्का पुढे म्हणाले की, दूतावासातील सर्व कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. हा बॉम्बस्फोट म्हणजे दूतावासावरील आतंकवादी आक्रमणच आहे. या स्फोटामागे जे, कोणी आहेत, त्यांना शोधून काढण्यासाठी आम्ही भारतासमवेत मिळून अन्वेषण करत आहोत. आताच कुठल्याही गटाचे नाव घेणे घाईचे ठरेल.