१४ जानेवारी या दिवशी झालेल्या पानीपत लढाईच्या निमित्ताने…
कौरव-पांडव संगरतांडव द्वापरकाली हो अती;
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥
‘द्वापरयुगात कौरव पांडव यांचे ज्याप्रमाणे युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे मराठे आणि गिलचे पानीपतच्या युद्ध भूमीवर लढले. आपल्या सर्वांना काय वाटले की, पानीपत वर्ष १७६१ ला होऊन गेले; पण तसे नाही. आता या क्षणाला पानीपतचे युद्ध चालू आहे. याचे कारण की, ज्याप्रमाणे हिंदु धर्मावर आघात होत आहेत, तर याला पानीपतच म्हणायचे. त्या वेळी अब्दालीनेही हेच केले होते आणि आताही तेच चालू आहे. तो काय करायचा ? हिंदूंच्या हत्या आणि गायीच्या कत्तली करायचा, लेकी-बाळींना पळवायचा; मग आता काय चालू आहे ?
आताही तेच चालू आहे, तेव्हा केवळ सरसकट कत्तली व्हायच्या; पण आता पडद्याआडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या केल्या जातात. त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होतात. आताही दळणवळण बंदीच्या काळात गोहत्या होतच होती ना ? आपल्या देशाचा गोमांस निर्यातीत प्रथम क्रमांक येतो. आपल्या देशात हत्या, दरोडे, बलात्कार, दंगली यांचे प्रमाण वाढले आहे.
अब्दालीने केलेल्या अत्याचाराप्रमाणे आजही अप्रत्यक्ष अत्याचार चालू असणे !
सध्या शाळांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज कोण ?, थोरले बाजीराव कोण ?’, असे प्रश्न विचारल्यावर मुलांकडे उत्तरे नसतात; पण त्याच्या उलट ‘सलमान खान कोण ?’, असे विचारल्यावर त्याची कुंडली सांगतात. हिंदु धर्माचे महत्त्व काय ? धर्माचरण कसे करतात ? हेही मुलांना ठाऊक नसते. त्या वेळी अब्दालीने अत्याचार केले, तेच अत्याचार आता अप्रत्यक्षपणे चालू आहे.
पानीपताचा डाग मिटवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक !
जर हिंदु युवकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आपला देश परत पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. पानीपत हरण्याचे कारण म्हणजे जात, भाषा, प्रांत यांमधील भेद ! पानीपत हा एक मराठी माणसांवर लागलेला डाग आहे आणि तो जर धुऊन काढायचा असेल, तर त्याची दिशा एकच असावी,
‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥
धर्म बुडवावा कि बडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ॥’,
या दिशेने प्रयत्न करावेत आणि देश-धर्मासाठी नियमित १ घंटा दिल्यास आपण वर्ष २०२३ ला नक्कीच हिंदु राष्ट्र स्थापन करू. जर आपण हिंदु राष्ट्र स्थापन केले, तर पानीपतवर हुतात्मा झालेल्या प्रत्येक हिंदुविराला ती खरी आदरांजली असेल.’
– कु. पार्थ घनवट (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२०)