देवता आणि हिंदु जनता यांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करायला हवा !

‘सातत्याने हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिपण्या करणारा आणि एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याला धडा शिकवणार्‍या हिंदूरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !

मुनव्वर फारूकी

आज समाजाला योग्य दृष्टीकोन देण्यासाठी अशा संघटनांची आवश्यकता आहे. आपल्या राष्ट्रात हिंदूंची संख्या अधिक असली, तरी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू जनता सुरक्षित नाही. ज्यांच्यामुळे कायद्याचा वचक बसतो, असे कायद्याचे रक्षक असलेले ‘पोलीस’ कठोर कारवाई करत नाहीत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे आणि जनता असुरक्षित झाली. देशात कायद्याचा धाक केवळ हिंदूंना दाखवला जातो. त्यामुळे हिंदूंच्या संघटनांना हिंदु धर्म आणि समाज यांना वाचवण्यासाठी आक्रमक पावले उचलावी लागतात, हे आजचे सत्य आहे. देशात आज लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे, तरी हिंदु धर्मावर अन्य पंथियांकडून अत्याचार चालूच आहेत. त्यामुळे देशात ‘देवता आणि हिंदु जनता यांचा कुणीही अवमान करू शकणार नाही’, असा कायदा यायला हवा.’

– सौ. गंधाली गोविंद मराठे, वाळपई, गोवा.