भारतीय प्राचीन पद्धतीकडे आता समाज वळू लागला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे; मात्र गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे ?, हेही गडकरी यांनी जनतेला सांगायला हवे, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली – देशातील अनेक गावांतील घरे आजही गायीच्या शेणाने सारवली जातात. भूमीही सारवली जाते. आता याच शेणाचा वापर करून रंगकाम करण्यासाठी रंग बनवण्यात येत आहेत. लवकरच खादी आणि ग्रामउद्योग आयोगाकडून ‘वेदिक पेंट’ विक्री करणार आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, या वेदिक रंगांमुळे शेतकर्यांना आर्थिक लाभ होणार आहे. यामुळे ज्यांच्याकडे गायी आहेत, त्यांना वार्षिक ५५ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. वेदिक रंग ‘डिस्टेंपर’ आणि ‘इमल्शन’ अशा २ प्रकारांत उपलब्ध होणार आहे. हे रंग पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, विषाणूविरोधी, अॅन्टी फंगल आणि वॉशेबल आहेत. रंगरंगोटी झाल्यावर केवळ ४ घंट्यांत हा रंग वाळणार आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan