सद्गुरुचरणी नित्य वास असावा ।

श्री. सुधाकर जोशी

श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो ।
अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥ १ ॥

सद्गुरुचरणी नित्य वास असावा ।
त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥ २ ॥

त्यांचे कवित्व करण्यासाठी ।
या बुद्धीचा उपयोग व्हावा ॥ ३ ॥

देवा, एकच मागणे आहे आता ।
आपुल्या चरणी मिळावा विसावा ॥ ४ ॥

दीनांच्या दिनकरांचे (टीप १) भजन गाता गाता ।
हा देह अनंतात विलीन व्हावा ॥ ५ ॥

भावपूर्ण शब्दांची माला ।
अर्पियली दीनांच्या दिनकरांना ॥ ६ ॥

माझा नमस्कार स्वीकारावा ।
आशीर्वाद या जिवाला मिळावा ॥ ७ ॥

 टीप १ – प.पू. भक्तराज महाराज यांचे

– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक