५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गुहागर (जि. रत्नागिरी) येथील चि. अवधूत हृषिकेश घाडे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील  चि. अवधूत हृषिकेश घाडे हा एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

​कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी (२९.११.२०२०) या दिवशी चि. अवधूत हृषिकेश घाडे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. अवधूत हृषिकेश घाडे

चि. अवधूत हृषिकेश घाडे याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. ‘मला तिसरा मास चालू असतांना श्री गणेशाने मला स्वप्नात दर्शन दिले.

१ आ. ‘शिवाच्या आत्मलिंगाचा तेजोमय प्रकाश मस्तकातून आत प्रवेश करत आहे आणि शिवलिंगासमोर बसून आराधना करत आहे’, असे जाणवणे : मला गर्भारपणात अनेक अद्भुत दृष्टांत व्हायचे. एकदा मला शिवाच्या आत्मलिंगाचा तेजोमय प्रकाश दिसला. ‘तो प्रकाश माझ्या मस्तकातून आत प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. एकदा ‘पंचतत्त्वे माझ्या शरिरात प्रवेश करत आहेत’, असे मला जाणवले. नंतर मला शिवलिंग दिसले आणि ‘मी त्याच्यासमोर बसून आराधना करत आहे’, असे जाणवले.

२. जन्मानंतर

२ अ. अवधूत जराही रडत नाही. त्याचा तोंडवळा नेहमी आनंदी आणि प्रसन्न असतो.

२ आ. सात्त्विकतेची ओढ

१. त्याला अंघोळ घालायला एक मावशी यायच्या. मावशी अवधूतला मर्दन करतांना तो त्यांच्याकडे न बघता उजव्या बाजूला भिंतीवर लावलेल्या गणपतीच्या छायाचित्राकडे बघायचा आणि हसायचा. त्या वेळी ‘तो गणपतीबाप्पाशी काहीतरी बोलत आहे’, असे आम्हाला वाटायचे. त्या मावशींनाही असेच जाणवायचे.

२. आमच्या घरात सनातनचा आकाश कंदिल कायमस्वरूपी लावलेला आहे. अवधूतला त्या कंदिलाचे पुष्कळ आकर्षण आहे. तो त्याकडे बघितल्यावर आनंदी होतो आणि त्याला हात लावल्यावर त्याच्या तोंडवळ्यावर आनंद जाणवतो.

२ इ. देवाची आवड

१. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर तो भजने ऐकत शांतपणे झोपतो.

२. ‘विठ्ठल, विठ्ठल, गोपाळकृष्ण, बालकृष्ण’, असे शब्द ऐकल्यावर तो टाळ्या वाजवत नाचतो.

३. त्याला गणपति आणि श्री स्वामी समर्थ यांचे छायाचित्र दिसल्यावर तो डोके ठेवून नमस्कार करतो.’

– सौ. अश्‍विता घाडे (आई), गुहागर (जि. रत्नागिरी)

४. ‘त्याला सतत देवघर असलेल्या खोलीत जायचे असते. तो त्यासाठी हट्ट करतो. तो रडत असतांना त्याला देवघर असलेल्या खोलीत नेल्यावर तो लगेच शांत होतो.

५. तो प.पू. गुरुमाऊलींच्या छायाचित्रावर डोके ठेवून नमस्कार करतो.

६. कुणी भजन म्हणत असेल, तर तो टाळ्या वाजवण्याची कृती लगेच करतो. ‘त्याला बाप्पा आहे’, असे सांगितल्यावर तो लगेच जमिनीवर डोके ठेवून नमस्कार करतो.

२ ई. त्याला लहान मुलांसमवेत खेळायला आवडते.

२ उ. आम्ही उदबत्ती, अत्तर आणि कापूर यांनी शरिरावरील आवरण काढतो. ते बघून तोही तशीच कृती करतो.

३. स्वभावदोष ​

हट्टीपणा.’

– श्रीमती गीता घाडे (आजी), गुहागर (जि. रत्नागिरी) (१.११.२०२०) ​

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.