(म्हणे) ‘मूर्तीपूजा करणार्‍या देशांना अल्लाने उत्तर दिले !’

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आतंकवादी संघटना ‘इसिस’चे अजब तर्कट !

असे आहे, तर इराण, पाकिस्तान यांसह मुसलमान राष्ट्र असलेल्या देशांमध्ये कोरोनाची लागण झाली, ती कशामुळे ? या महामारीमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमानांचे बळी गेले आहेत, तसेच अन्यही मुसलमान राष्ट्रांत मुसलमानांचेच बळी गेले आहेत, म्हणजेच ते सर्व मूर्तीपूजा करणारे होते, असेच इसिसला म्हणायचे आहे ना !

काही मुसलमान हज यात्रेला जाऊन आले आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. मग त्यांनाही अल्लाने शिक्षा दिली, असे इसिसला म्हणायचे आहे का ?

लंडन – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना इसिसने एक परिपत्रक काढले आहे की, अल्लाने स्वत: निर्माण केलेल्या देशांमध्ये पुष्कळ मोठे संकट आणले आहे. मूर्तीपूजा करणार्‍या देशांना ही कठोर चेतावणी आहे. अल्लाने त्याला मानणार्‍या देशांचे संरक्षण करावे आणि नास्तिक देशांवर कोरोनाला पसरवावे. अल्लाने त्याच्या विरोधात विद्रोह करणार्‍यांना दंड द्यावा आणि जे त्याचे ऐकतात, त्यांना वाचवावे. अल्लाने कोरोनाची महामारी पसरवून आक्रमण करणार्‍या देशांना त्यांचे सैन्य मागे घ्यायला लावले आहे. यापूर्वी ‘इसिस’ने त्यांच्या आतंकवाद्यांना ‘‘कुणाला हात लावू नका’, ‘हात उघडे ठेवू नका’, ‘तोंड झाका’’, असे आदेश दिले आहेत. (जर अल्लाने कोरोनाची महामारी पसरवली, तर मग आतंकवाद्यांना अशा सूचना देण्याची आवश्यकताच काय ? याचा अर्थ अल्लाने इसिसलाही शिक्षा दिली आहे, असे म्हणावे लागेल ! – संपादक)