
१. ‘पार्किन्सन्स’चा आजार असूनही सभागृहात ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’चे प्रक्षेपण पहाण्यासाठी आधार घेतल्याविना चालत जाऊन आसंदीवर बसू शकणे
‘सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ पार पडला. त्या दिवशी हा महायज्ञ मला ‘ऑनलाईन’ पहाण्यास मिळाला. मी यज्ञाचे प्रक्षेपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बसून पाहिले. आश्रमातील तळमजल्यावरील सभागृहामध्ये बैठक व्यवस्था केली होती. मला ‘पार्किन्सन्स’चा (मेंदूशी संबंधित आजार) आजार असल्याने काठी हातात धरून हळूहळू पावले टाकत सावकाश चालावे लागते. माझी आसंदी ‘प्रोजेक्टर’च्या एका बाजूला होती. खरेतर तेथे आसंदीवर जाऊन बसणे माझ्यासाठी कठीण होते; पण काय आश्चर्य ! जणू काही माझा ‘पार्किन्सन्स’चा आजारच त्या दिवसापुरता नाहीसा झाला होता. त्यामुळे मी काठी न घेता सहजतेने चालत गेलो आणि सहजतेने आसंदीवर बसलो. एरव्ही मला चालतांना काठीचा आधार घ्यावा लागतो.

२. ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’तील चैतन्यामुळे शरिराला हलकेपणा जाणवणे
मी सहजतेने आसंदीतून उठू शकलो आणि काठीचा आधार न घेता भोजनकक्षात जाऊन महाप्रसाद ग्रहण केला. आधी मला वाटले, ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांनी मला दिलेल्या नामजपामुळे माझी ‘पार्किन्सन्स’ची व्याधी दूर झाली; मात्र हा सर्व ‘राजमातंगीदेवी महायज्ञाचा परिणाम आहे’, हे नंतर माझ्या लक्षात आले. महायज्ञातील चैतन्यामुळे माझ्या सप्तचक्रांवर चांगला परिणाम झाल्याचे मला अनुभवता आले. माझे शरीर पुष्कळ हलके झाले होते. ‘या यज्ञाचा परिणाम साधकांवर होतो’, हे स्थुलातून मला अनुभवता आले.
ही अनुभूती देणारे माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक वैद्य प्रकाश घाळी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२६)
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !
मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
शिष्यापेक्षा गुरूंची साधना पुढच्या टप्प्याची !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती