तक्रार प्रविष्ट केल्यानंतर आरोपीला अटक
परिसरातील परप्रांतीय कामगारांच्या चौकशीची मागणी

पुणे – जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात ४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी केशकर्तन करणार्या परप्रांतीय महंमद फरदीन शहा याला पारगाव पोलिसांनी अटक केली. न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
४ वर्षांची पीडिता नातेवाइकांसमवेत केस कापण्यासाठी स्थानिक केशकर्तनालयामध्ये गेली होती. त्या वेळी बालिकेला एकटीला पाहून आरोपी महंमद याने तिच्याशी अश्लील आणि चुकीचे वर्तन केले. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांनी लगेचच पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
‘आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्ष’ आणि ‘नाभिक समाज सलून असोसिएशन’ने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या परिसरात व्यवसाय करणारे सर्व परप्रांतीय कामगार आणि केशकर्तन करणारे व्यावसायिक यांची चौकशी अन् चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी स्थानिक संघटनांनी केली आहे.
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !
अकोला येथील शेतकर्यांना हानीभरपाई
नाशिक शहर कार्यक्षेत्रात २७ जुलैपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश !
देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू ! – मंत्री गिरीश महाजन
पुणे येथील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’त ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्या पती-पत्नीवर गुन्हा नोंद