कर्नाटकच्या परिवहनमंत्र्यांनी ओळख न सांगता अचानक बसमधून केला प्रवास

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी ११ जुलैच्या रात्री हेब्बल ते नागाशेट्टीहल्ली या मार्गावरील बी.एम्.टी.सी. बसमध्ये प्रवास केला. ते बसमध्ये चढले आणि त्यांनी वाहकाकडे २ तिकिटे मागितली. भाड्यासाठी मंत्र्यांनी बसवाहकाला (कंडक्टरला) १०० रुपयांची नोट दिली. त्यावर कंडक्टरने सुट्ट्या पैशांची मागणी केली. मंत्र्यांनी सुट्टे पैसे नसल्याचे सांगताच कंडक्टरने उद्धटपणे ‘सुट्टे पैसे देऊ शकत नसाल, तर बसमधून उतरा’, असे सुनावले. मंत्र्यांनी तोंडाला मास्क लावलेला असल्यामुळे चालक आणि वाहक त्यांना ओळखू शकले नाहीत. कोणताही वाद न घालता मंत्री शांतपणे बसमधून खाली उतरले; मात्र प्रवाशांना होणार्या या त्रासाची गंभीर नोंद घेत नंतर या चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (असे किती बस चालक आणि वाहक यांच्यावर कारवाई करणार ? – संपादक) २ घंट्यांच्या कालावधीत मंत्री सुरेश यांनी १० हून अधिक सरकारी बसमधून प्रवास केला. एक सामान्य प्रवासी म्हणून त्यांनी तिकिटे खरेदी केली, सहप्रवाशांशी संवाद साधला आणि बस सेवेविषयी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
बी.एम्.टी.सी.च्या बसमधील एका प्रवाशाने एका ठिकाणी उतरण्याचे संकेत दिले, तरीही बसचालकाने त्या बस स्थानकावर बस थांबवली नाही. हा निष्काळजीपणा पाहून मंत्र्यांनी या बसचे चालक आणि वाहक यांना तात्काळ निलंबित केले.
रिक्शा चालकाची लुबाडणूक आणि मंत्र्यांची तंबी !
रिक्शाच्या मीटरवर ३० रुपये भाडे दिसत असतांना रिक्शाचालक ३६ रुपयांची मागणी करत होता. मंत्र्यांनी याविषयी विचारणा केली असता चालकाने, ‘मीटर नंतर दुरुस्त करून घेईन’, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. ही फसवणूक पाहून त्यांनी रिक्शाचालकाला फटकारले आणि समज दिली. (बहुतेक रिक्शाचालकांकडून अशी लुबाडणूक होते, हे जगजाहीर असतांना कोणतेही सरकार ठोस उपाय काढत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपतत्याला अटक
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
मराठी नामफलक न लावणार्या मुंबईतील ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांवर कारवाई !