‘दुःखापासून आनंदापर्यंत जाणिवेचे विविध स्तर आहेत. प्रत्येक स्तरानुसार आपल्या मनात विशिष्ट भावना उमटतात, तसेच जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. प्रस्तुत लेखात जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहयोगांशी असलेला संबंध, यांचे विवेचन केले आहे.

१. जाणिवेशी संबंधित तात्त्विक विवेचन
१ अ. जाणीव म्हणजे काय ? : मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते. जाणीव म्हणजे जागरूकता (awareness). या जाणिवेचा स्रोत आत्मा (चैतन्य) आहे; परंतु जिवाला ‘मी अमुक आहे’, अशी जाणीव अहंमुळे होत असते. जिवातील अहंच्या प्रमाणानुसार त्याच्या जाणिवेचे स्वरूप पालटते, उदा. अहं पुष्कळ असल्यास व्यक्तीला ‘मी शरीर आहे’, अशी, तर अहं न्यून असल्यास ‘मी चैतन्य आहे’, अशी जाणीव असते.
१ आ. जाणिवेच्या प्रत्येक स्तरानुसार व्यक्तीच्या मनाची स्थिती निराळी असणे : जाणिवेच्या प्रत्येक स्तरावर मनाची स्थिती, मनात येणार्या भावना, मन देत असलेला प्रतिसाद इत्यादी सर्व निराळे असते. जाणिवेचे खालचे स्तर संकुचित असतात, तर वरचे स्तर व्यापक असतात. खालच्या स्तरांवरील जाणिवेमुळे मनात काम, क्रोध, द्वेष, मत्सर आदी नकारात्मक भावना उमटतात, तर वरच्या स्तरांवरील जाणिवेमुळे मनात प्रेम, सद्भाव, जिज्ञासा, आनंद आदि सकारात्मक भावना निर्माण होतात.
२. व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
अमेरिकेतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. डेव्हिड आर्. हॉकिन्स (मृत्यू – वर्ष २०१२) यांनी ‘व्यक्तीच्या जाणिवेच्या विविध स्तरांनुसार तिची मानसिक स्थिती कशी असते?’, याचे मूल्यमापन केले आहे. या मूल्यमापनाला त्यांनी ‘Map of consciousness’ असे नाव दिले. हे मूल्यमापन ‘जाणिवेच्या प्रत्येक स्तरावर व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना उत्पन्न होतात ? तसेच व्यक्ती जीवन आणि ईश्वर यांच्याकडे कशा दृष्टीकोनातून पहाते ?’, हे दर्शवते.
व्यक्तीच्या भावना आणि तिचे दृष्टीकोन आदींचा ग्रहांशीही संबंध आहे; कारण ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीतील ग्रह हे व्यक्तीच्या चित्तातील संस्कार दर्शवतात. चित्तातील संस्कारांना अनुसरून व्यक्तीच्या भावना अन् दृष्टीकोन इत्यादी असतात. जाणिवेचे विविध स्तर, त्यांत कार्यरत भावना आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध यांचे विवेचन पुढे दिले आहे.
टीप : डॉ. डेव्हिड आर्. हॉकिन्स यांनी प्रत्येक स्तराला दिलेले मूळ इंग्रजी नाव कंसात दिले आहे.

२ अ. दुःखप्रधान स्तर : यामध्ये अनुक्रमे ‘लाज’, ‘अपराधीपणा’, ‘निराशा’, ‘शोक’ आणि ‘भय’ हे स्तर आहेत. या स्तरांवर व्यक्ती निराश, कर्तव्य टाळणारी, ऊर्जाहीन आणि दुर्बल असते. ती मनाने खचलेली असते. तिला जीवन म्हणजे कारागृहातील शिक्षा वाटते. ती ईश्वराला ‘निष्ठूर आणि दंड देणारा’, असे समजते.
२ अ १. लाज (Shame) : हा सर्वांत कनिष्ठ स्तर आहे. एखाद्या व्यक्तीला इतरांनी सतत न्यून लेखल्यामुळे किंवा स्वतःच्या असामर्थ्यामुळे तिला स्वतःची लाज वाटते. ती स्वतःचा तिरस्कार करते. तिला स्वतःचे काही मूल्य वाटत नाही. तिला जीवन नकोसे वाटते, तसेच तिला जीवन संपवावेसे वाटते.
२ अ २. अपराधीपणा (Guilt) : या स्तरावर व्यक्तीला इतरांनी सतत दूषणे दिल्यामुळे किंवा स्वतःकडून झालेल्या गंभीर चुकांमुळे अपराधी वाटत असते. ती नेहमी स्वतःला दोष देते, तसेच स्वतःला शिक्षा करते. ती भूतकाळातील घटनांमध्ये अडकते, तसेच स्वतःला क्षमा करत नाही.
२ अ ३. निराशा (Apathy) : या स्तरावरील व्यक्ती प्रतिकूल परिस्थिती, अडथळे, अपयश, अकार्यक्षमता आदींमुळे निराश असते. ‘जीवनात काही चांगले, सकारात्मक आणि उन्नतीकारक होणार नाही’, अशी तिची धारणा झालेली असते. ती नशीब आणि बाह्य परिस्थिती यांवर अवलंबून रहाते. तिच्यात प्रयत्न करण्याची ऊर्जा नसते.
२ अ ४. शोक (Grief) : या स्तरावर व्यक्ती दुःखी असते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे, जोडीदारापासून विभक्त होणे, मोठी आर्थिक हानी होणे आदी दुःखदायक प्रसंगांमुळे तिला पुष्कळ मनोवेदना होतात. ती स्वतःला परिस्थितीचा पीडित मानते. तिला संपूर्ण जग दुःखमय वाटते.
२ अ ५. भय (Fear) : या स्तरावर व्यक्तीला स्वतःविषयी असुरक्षितता वाटते. कोणतीही कृती करण्यापूर्वी ती संभाव्य धोक्यांचा अधिक विचार करते. तिला सगळ्या गोष्टींची अनिश्चितता वाटत असते. तिला भविष्याची चिंता लागलेली असते. त्यामुळे सुरक्षितता मिळवण्यासाठी ती आजूबाजूचे लोक, परिस्थिती आदींवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत असते. ती बचावात्मक भूमिकेत रहाते.
२ आ. दुःखप्रधान स्तरांशी संबंधित ग्रहयोग : ग्रह दूषित असणे, म्हणजे तो शत्रूग्रहाच्या कुयोगात, प्रतिकूल स्थानात, प्रतिकूल राशीत असणे इत्यादी
२ आ १. दूषित शुक्र : ‘शुक्र’ ग्रह मानसिक सुखाशी संबंधित आहे. कुंडलीत शुक्र ग्रह दूषित असल्यास कुटुंबसुख न लाभणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे, कुणाचा आधार न मिळणे, जीवनात कष्ट पुष्कळ असणे इत्यादी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे निराशा, शोक आणि दुःख इत्यादी वाटेला येते.
२ आ २. दूषित चंद्र : ‘चंद्र’ हा मनोबल दर्शवतो. कुंडलीत चंद्र दूषित असल्यास चिंता, काळजी, भय, न्यूनगंड इत्यादी वाटेला येणे, तसेच अन्य मानसिक त्रास होण्याची शक्यता असते.
२ आ ३. दूषित बुध : ‘बुध’ हा ग्रह मेंदू आणि आकलनशक्ती यांच्याशी संबंधित आहे. कुंडलीत बुध दूषित असल्यास शारीरिक व्यंग, वाचादोष, मेंदूची अपुरी वाढ, आकलनक्षमता अल्प असणे आदींमुळे स्वतःची लाज वाटणे, स्वतःला दोष देणे, हतबलता वाटणे इत्यादी भावना निर्माण होऊ शकतात.
२ आ ४. दूषित रवि : ‘रवि’ हा आत्मविश्वासाचा सूचक असतो. कुंडलीत रवि दूषित असल्यास अपयश मिळाल्यामुळे किंवा समाजात मानहानी झाल्यामुळे आत्मविश्वास हरवणे, तसेच लाज, भय, निराशा, अपराधीपणा वाटणे इत्यादी परिणाम होऊ शकतात.
२ आ ५. निर्बली मंगळ : ‘मंगळ’ हा ग्रह कर्म करण्याची ऊर्जा देतो. कुंडलीत मंगळ ग्रह निर्बल असल्यास आळस, चालढकलपणा, उत्साह नसणे, भिडस्तपणा, भीती वाटणे, परिस्थितीला दोष देणे इत्यादींमुळे व्यक्तीमध्ये क्रियाशक्ती अल्प असते.
२ इ. अहंकारप्रधान स्तर : यामध्ये अनुक्रमे ‘लालसा’, ‘क्रोध’ आणि ‘अभिमान’ हे स्तर आहेत. या स्तरांवर व्यक्तीमध्ये कर्म करण्याची ऊर्जा असते; पण तिला दिशा नसते. तिच्यात अविचारीपणा, आवेगशीलता आणि क्रोध अधिक असतो. तिला जीवन, म्हणजे कामना आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन वाटते. ती ईश्वराला दुर्बल लोकांची भ्रामक कल्पना मानते.
२ इ १. लालसा (Desire) : या स्तरावर व्यक्ती बाह्य गोष्टींविषयी आसक्त असते. तिचे सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. ती इंद्रिये, भौतिक वस्तू, पैसा, सत्ता, प्रतिष्ठा आदींद्वारे सुख मिळवण्यासाठी उतावीळ असते. हे साध्य न झाल्यास ती व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. ती इतरांच्या व्यावहारिक परिस्थितीशी स्वतःची तुलना करते आणि त्यामुळे ती असंतुष्ट अन् असमाधानी असते.
२ इ २. क्रोध (Anger) : या स्तरावरील व्यक्ती संघर्षप्रिय असते. ती स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी इतरांवर वर्चस्व गाजवते. तिच्या उत्कर्षाच्या आड येणार्या गोष्टींच्या विरोधात ती बंड पुकारते. ती प्रसंगी हिंसेचा मार्ग अवलंबते. तिला सुख देणार्या गोष्टींवर ती आसक्त असते, तर दुःख देणार्या गोष्टींचा ती द्वेष करते. तिला समर्थन न देणार्या लोकांशी ती सूडबुद्धीने वागते.
२ इ ३. अभिमान (Pride) : या स्तरावर व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते. ती इतरांमध्ये तिची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करते. तिला इतरांकडून मान्यता मिळवण्याची इच्छा असते. ती स्वतःची चूक स्वीकारून कमीपणा घेत नाही, तसेच तिच्यात शिकण्याची वृत्ती अल्प असते. तिची वृत्ती बहिर्मुख असते.
२ ई. अहंकारप्रधान स्तरांशी संबंधित ग्रहयोग
२ ई १. शुक्र, मंगळ आणि राहू यांच्यातील परपस्परयोग : कुंडलीत शुक्र, मंगळ आणि राहू यांचे एकमेकांशी महत्त्वाचे योग असल्यास व्यक्तीमध्ये कामना अधिक असतात. ती अन्न, वस्त्र, अलंकार, इंद्रिये, भौतिक वस्तू आदींतून सुख मिळवण्यासाठी धडपडते. हे ग्रहयोग विशेषतः पृथ्वीतत्त्वाच्या वृषभ आणि मकर, तसेच जलतत्त्वाच्या कर्क अन् वृश्चिक राशींमध्ये अधिक परिणामी असतात.
२ ई २. चंद्र, बुध आणि मंगळ यांच्यातील योग : कुंडलीत चंद्र, बुध आणि मंगळ यांचे एकमेकांशी महत्त्वाचे योग असल्यास व्यक्तीमध्ये टीका करणे, स्पर्धा करणे, मनाप्रमाणे वागणे, अविचारीपणा, उतावीळपणा, आग्रही वृत्ती इत्यादी दोष असतात. व्यक्ती मनस्वी (स्वत:च्या मताप्रमाणे वागणारी), लहरी आणि संतापी असते. ती स्वतःच्याच सुखाचा आणि लाभाचा विचार करते.
२ ई ३. चंद्र, रवि आणि मंगळ यांच्यातील परपस्परयोग : कुंडलीत चंद्र, रवि आणि मंगळ यांचे एकमेकांशी महत्त्वाचे योग असल्यास व्यक्तीमध्ये स्वतःला श्रेष्ठ समजणे, स्वतःला महत्त्व देणे, इतरांवर वर्चस्व गाजवणे, प्रतिमा जपणे यांसारखे अहंचे पैलू असतात. हे योग विशेषतः अग्नितत्त्वाच्या मेष आणि सिंह, तसेच पृथ्वीतत्त्वाच्या वृषभ अन् मकर या राशींमध्ये अधिक परिणामी असतात.’ (क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.६.२०२६)
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !
नियमित साधनेने मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !
जपमाळ
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !