शांकर पाठशाळा, कवळे (फोंडा, गोवा) येथे ‘भागवत पुराण(चिंतन)’वरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने २ शोधनिबंध सादर
शांकर पाठशाळेत सादर केलेल्या दोन्ही शोधनिबंधाचे मूळ लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आहेत !

फोंडा (गोवा) – नियमित साधनेद्वारे मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते, अशी माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी दिली. शांकर पाठशाळा, कवळे, फोंडा, गोवा येथे ‘भागवत पुराण (चिंतन)’ या विषयावर नुकतेच एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये फोंडा, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी ‘मानसशास्त्राच्या पलीकडील मन : मानवी निर्णयप्रक्रियेचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर शोधनिबंध ऑनलाईन सादर केला. शोधनिबंध सादर करतांना श्री. क्लार्क यांनी ही माहिती दिली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने सादर केलेल्या या दोन्ही शोधनिबंधाचे मूळ लेखक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आहेत.

शांकर पाठशाळेने आयोजित केलेल्या परिसंवादात देश-विदेशातील विद्वान संशोधकांनी भागवत पुराणातील तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि आधुनिक जीवनातील त्याची उपयुक्तता या विषयावर त्यांचे संशोधनपर निबंध सादर केले.
श्री. शॉन क्लार्क यांनी हा शोधनिबंध मांडतांना बुद्धीमान व्यक्तीही कधी-कधी असे निर्णय का घेतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो ? स्पष्ट विसंगती असूनही काही नाती टिकून रहातात, तर सर्व काही अनुकूल असूनही काही नाती का अपयशी ठरतात ? या प्रश्नांची अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीकोनातून उत्तरे मांडली.
श्री. क्लार्क म्हणाले, ‘‘आपल्या निर्णयप्रक्रियेमध्ये मानवी मनातील गूढ कार्यपद्धत, मानवी मनाची जाणीव (कॉन्शियस माईंड) आणि अचेतन (सबकॉन्शियस माइंड) रचना, कर्मसंस्कार, प्रारब्ध आणि निर्णयप्रक्रियेतील आध्यात्मिक विज्ञानाची भूमिका महत्त्वाची असते.’’ श्री. क्लार्क यांनी या वेळी त्यांचे विचार, भावना, निर्णय आणि कृती यांना आकार देणार्या अदृश्य घटकांची सखोल माहिती करून दिली.
मंदिरे ही केवळ उपासनेची स्थळे नसून ती सकारात्मक सूक्ष्म ऊर्जेची केंद्रे आहेत ! – सौ. श्वेता क्लार्क

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता क्लार्क यांनी ‘भारतीय मंदिरे का महत्त्वाची आहेत ? : सकारात्मकता, कल्याण आणि सामाजिक समरसतेचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर परिसंवादामध्ये शोधनिबंध सादर केला. त्यांनी विविध संस्कृतींतील लोक मंदिर दर्शनानंतर शांतता, मानसिक स्पष्टता आणि आध्यात्मिक उन्नतीची अनुभूती का घेतात ? विज्ञान आणि भौतिक प्रगतीच्या युगातही भारतीय मंदिरे लाखो भाविकांना सातत्याने आकर्षित करण्यामागील आध्यात्मिक कारणे कोणती आहेत ? या प्रश्नांची अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून उत्तरे मांडली.
त्या म्हणाल्या, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने सूक्ष्म-ऊर्जेचे मूल्यांकन करणार्या पद्धती आणि ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ यांसारख्या आधुनिक वैज्ञानिक उपकरणांचा वापर करून मंदिरांच्या परिणामांचा सखोल अभ्यास केला आहे. भारतीय मंदिरे ही केवळ उपासनेची स्थळे नसून ती सकारात्मक सूक्ष्म ऊर्जेची केंद्रे आहेत. मंदिरे ही मानसिक शांतता, आध्यात्मिक उन्नती, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणाची शुद्धता यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.’’
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !
जपमाळ
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !