कर्नाटकामध्ये शिक्षिकेने धमकी दिल्याने ८ वीतील विद्यार्थिनीने केली आत्महत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

बेंगळुरू (कर्नाटक) – गृहपाठ अपूर्ण राहिल्याने शाळेतून २० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याने आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याने ८ वीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना कर्नाटकामधील अनेकल येथे घडली. मधुश्री असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

मधुश्री हिच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर त्यांच्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी उत्तरदायी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा उद्दाम शिक्षकांवर शिक्षण विभाग काय करवाई करणार ?
  • विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणात जीवनाचा उद्देश आणि परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे शिक्षण मिळत नसल्याचेच हे उदाहरण आहे ! हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षणाद्वारे जीवनाचा उद्देश शिकवला जाईल !