१६ जणांना बाहेर काढण्यात यश, आतापर्यंत एक जण मृत

पुणे – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचर्याचे ऊर्जेत रुपांतर करणे) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचर्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याच्या दुर्घटनेला ४० घंटे उलटल्यानंतरही बचावकार्य चालू आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालूच आहेत. या इमारतीमध्ये एकूण २३ जण अडकले होते. त्यातील १६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १० जुलै या दिवशी सकाळी एका कामगाराला बाहेर काढले; मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. अजूनही ८ कामगार अडकले आहेत.
इमारतीतील कचरा बाहेर काढून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘गार्बेज पोकलेन’च्या (कचरा व्यवस्थापनासाठी वापरले जाणार्या यंत्राच्या) साहाय्याने रात्रभर कचरा स्थलांतरित करण्याचे काम चालू होते.
घायाळ झालेले कर्मचारी साईनाथ रुग्णालयात उपचार घेत होते. त्यातील ४ जणांना सोडण्यात आले. २ जण अतिदक्षता विभागात आहेत, अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
नातेवाइकांचा गंभीर आरोप
अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे की, पहाटे ३ च्या सुमारास बचाव कार्य थांबवण्यात आले. घटनास्थळी प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.
पुण्यनगरीत दोन्ही पालख्यांचे भक्तीमय वातावरणात स्वागत !
भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री
कोयना धरणात ५० टी.एम्.सी. पाणीसाठा !