मान्यवरांचा गौरव

पुणे, १० जुलै (वार्ता.) – ‘महाराष्ट्र ब्राह्मण सभे’च्या वतीने १ जुलै या दिवशी ‘डॉक्टर्स डे’ आणि ‘सनदी लेखापाल (सीए) दिन’ यांनिमित्त विविध क्षेत्रांतील ५ मान्यवरांचा शाल, गुलाबपुष्प, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सभेच्या शताब्दी वर्षानिमित्त (६ जानेवारी २०२६ ते ६ जानेवारी २०२७) या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी डॉ. मिलिंद मोडक, डॉ. गिरीश कामत, डॉ. मोहन परांजपे, डॉ. वैशाली भगत आणि सनदी लेखापाल (सीए) इंद्रजीत कल्याणकर, सुभाष दामले यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना सर्व मान्यवरांनी स्वत:च्या यशाचे श्रेय माता-पिता, कुटुंब आणि समाज यांना देत कृतज्ञता व्यक्त केली.
सनातन वैदिक धर्माची पाळेमुळे जपानमध्येही ! – डॉ. मिलिंद मोडक
डॉ. मिलिंद मोडक यांनी मार्गदर्शनात सांगितले की, सध्याच्या काळात आहार, व्यायाम, मानसिक आणि आध्यात्मिक या चार स्तरांवर जीवन जगणे, ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने नियमित व्यायाम, सात्त्विक आहार, आध्यात्मिक विचार आणि मनन-चिंतन करायला हवे. स्वत:चे जपानमधील अनुभव सांगतांना ते म्हणाले, ‘‘जपानमधील एका मंदिरात स्वस्तिकाचे प्रतीक पहायला मिळते. यावरून सनातन वैदिक हिंदु धर्माची पाळेमुळे जपानमध्येही असल्याचे दिसून येते.’’
संस्थेच्या उपक्रमांचा आढावा
कार्यक्रमाचा आरंभ आरोग्य प्रमुख डॉ. कांचन खैराटकर यांनी केलेल्या ईशस्तवनाने झाला. राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अतुल व्यास यांनी संस्थेचा परिचय आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री उमेश पाठक, निनाद जोशी, काका धर्मावत आणि रूपाली जोशी यांसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
मोशी (पुणे) येथील कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य चालूच !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री
कोयना धरणात ५० टी.एम्.सी. पाणीसाठा !