
पणजी, १० जुलै (वार्ता.) -‘मेसर्स लील इलेक्ट्रीकल्स लिमिटेड’ (पूर्वीची ‘लॉइड इलेक्ट्रीक अँड इंजिनीयरिंग लिमिटेड’)चे प्रवर्तक भरत राज पुंज आणि इतर यांच्याशी संबंधित ३७६ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या जयपूर विभागीय कार्यालयाने ११२ कोटी ९० लाख रुपये मूल्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये गोवा, देहली, उत्तराखंड, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र आणि तमिळनाडू येथील भूमी, औद्योगिक भूखंड आणि निवासी मालमत्ता, तसेच ह्युस्टन, टेक्सास (अमेरिका) येथील एक निवासी मालमत्ता यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त बँक शिल्लक रक्कम, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचाही यात समावेश आहे. आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला (कन्सोर्टियम) खोटी आणि फेरफार केलेली आर्थिक विवरणपत्रे सादर करून फसवणूक केली आणि त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या बँकांची अनुमाने ३७६ कोटी रुपयांची हानी झाली. या आरोपांच्या आधारे ही कारवाई अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री
जेवणात अळ्या सापडल्यामुळे गोवा विद्यापिठाचा खानावळ (मेस) कंत्राटदार निलंबित
नेमळे येथे चारचाकीच्या अपघातानंतर सिंधुदुर्गात गोमांससदृश मांसाची वाहतूक होत असल्याचे उघड
महाजनांनी प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट
ठाणे येथे घराचा भाग कोसळला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे घायाळ
Kerala Student Murder : उझबेकिस्तानमध्ये धर्मांतरास नकार दिल्याने धर्मांध मुसलमानाकडून केरळम्स्थित तरुणीची हत्या