पुणे न्यायालयाचा निर्णय

पुणे – मुंढवा परिसरातील १ सहस्र ८०० कोटी बाजारमूल्याच्या ४० एकर सरकारी भूमी व्यवहाराचा खरेदीखत (दस्त) पुणे न्यायालयाने रहित केला. ‘या व्यवहारात पैशांची देवाण-घेवाण झाली नाही. भूमीचा ताबाही दिला गेलेला नाही’, हे ‘अमेडिया आस्थापना’चे म्हणणे ग्राह्य धरत न्यायालयाने हा व्यवहार रहित केला; मात्र या भूमी व्यवहारातील २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंडाचे काय ? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
मुंढवा येथील ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थे’च्या कह्यातील ४० एकर भूमीचा व्यवहार कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ आस्थापनासह ३०० कोटी रुपयांचा झाला होता. या जागेवर ‘आयटी पार्क’ उभारण्यात येणार असल्याचे सांगून मुद्रांक शुल्कामध्ये ५ टक्क्यांची सवलत घेतली होती. २ टक्के मुद्रांक शुल्क न भरता केवळ ५०० रुपयांच्या शुल्कावर व्यवहार पूर्ण केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खरगे यांनी चौकशी समिती नेमली. त्यात ही भूमी सरकारची असल्याचे स्पष्ट झाले होते.
भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
मोशी (पुणे) येथील कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य चालूच !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री
कोयना धरणात ५० टी.एम्.सी. पाणीसाठा !