
सातारा, १० जुलै (वार्ता.) – कोयना धरणामध्ये प्रतीसेकंद ३१ सहस्र ४७० क्यूसेक पाण्याची आवक चालू आहे. सध्या कोयना धरणात उपलब्ध ५० टी.एम्.सी., तर उपयुक्त ४५.६४ टी.एम्.सी. पाणीसाठा आहे. १ जूनपासून आतापर्यंत कोयना येथे ८८ मिलिमीटर, नवजा १३४ मिलिमीटर, महाबळेश्वर ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १०५.२५ टी.एम्.सी. पाणी साठवणूक क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून ५४.४९ टी.एम्.सी. पाण्याची आवश्यकता आहे. नदीकाठच्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. पावसाचा जोर ओसरला असून पाण्याखाली गेलेले काही पूल, साकव पूर्ववत् झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पुण्यनगरीत दोन्ही पालख्यांचे भक्तीमय वातावरणात स्वागत !
भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
मोशी (पुणे) येथील कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य चालूच !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री