
मुंबई – गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.
गोमाता ही केवळ एक प्राणी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा देण्यात आला असला, तरी गोतस्करी आणि अवैध गोहत्या यांच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा घंटा चर्चेत गोवंश रक्षणाचे सूत्र तळमळीने आणि अभ्यासपूर्ण रितीने मांडले. यासह आमदार मुनगंटीवार यांनी ‘राज्य गोसेवा आयोगा’ला दिवाणी न्यायालयाचे अधिकार द्यावेत, गोवंश तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने कायमस्वरूपी जप्त करावीत, सीमावर्ती तपासणी नाक्यांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवावेत आणि कारवाईसाठी विशेष पोलीस पथके स्थापन करावीत, तसेच प्रत्येक गोवंशियांसाठी ‘यूआयडी टॅगिंग’ (ओळख क्रमांक) सक्तीचे करावे, अशा मागण्या केल्या.
कठोर कारवाई करण्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आश्वासन
आमदार मुनगंटीवार यांच्या मागण्यांची नोंद घेत राज्य सरकारने गोवंश संरक्षण कायदा अधिक कठोर करण्याचे, तसेच या प्रकरणी पुढील ३ महिन्यांच्या आत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !
तुळजापूर येथील ४ सहस्र एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करा !- अंबादास दानवे, आमदार, ठाकरे गट
धार्मिकदृष्ट्या जागरूक हिंदूच हिंदु राष्ट्रासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतात ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती