मुलीसह ७ जणांना अटक

जयपूर (राजस्थान) – अनुकंपा तत्त्वावर आईला मिळालेली नोकरी स्वतःला मिळावी आणि मालमत्तेत वाटा मिळावा, यावरून मुलीने सुपारी देऊन आईची हत्या घडवून आणल्याची घटना येथील प्रतापनगरमध्ये घडली. न्यायालयीन लिपिक असलेल्या ४५ वर्षीय श्रीमती नीरज शर्मा यांची चारचाकी वाहनाद्वारे चिरडून हत्या करण्यात आली होती. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय पोलिसांना आला होता. अन्वेषणातून कौटुंबिक कट आणि भाडोत्री मारेकरी यांचा सहभाग उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी नीरज यांची मुलगी आयुषी शर्मा हिच्यासह ७ जणांना अटक केली असून, एक आरोपी अजूनही पसार आहे.
🚨 Jaipur Horror: Mother Murdered for Government Job
A woman in Jaipur got her own mother murdered to secure a Government job under the compassionate appointment scheme.
The murder was staged as a road accident until CCTV footage exposed the conspiracy. Seven people have been… pic.twitter.com/A9LeucurG6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2026
पोलीस उपायुक्त रंजिता शर्मा यांनी सांगितले की, नीरज यांच्या पतीचे सुमारे एका वर्षापूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर नीरज यांना अनुकंपा तत्त्वावर न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. मुलगी आयुषीला स्वतःला ती सरकारी नोकरी हवी होती; मात्र नीरज यांनी स्वतः ती नोकरी स्वीकारली. याखेरीज गेल्या २-३ वर्षांपासून आई आणि मुलगी यांच्यामध्ये मालमत्तेवरूनही वाद चालू होता. नोकरी आणि मालमत्ता हस्तगत करण्यासाठी आयुषीने तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उपाख्य रवि यांच्यासमवेत मिळून आईला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा याला ७ लाख रुपयांची सुपारी दिली.
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’