ढाका (बांगलादेश) – शहराच्या जवळ असलेल्या सावर येथे ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी’च्या (‘एन्.सी.पी.’च्या) सभेच्या वेळी झालेल्या जोरदार स्फोटामुळे गोंधळ उडाला. या स्फोटात ३ जण घायाळ झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे एक वरिष्ठ नेते मंचावरून समर्थकांना संबोधित करत असतांनाच हा स्फोट झाला.
🚨 Bomb Blast at Anti-Sheikh Hasina Rally in Bangladesh
A bomb exploded during a student-led National Citizen Party rally in Savar, near Dhaka, injuring at least 3 people. MP Nahid Islam was on the stage when the blast occurred.
The incident raises fresh concerns over political… pic.twitter.com/C2cLt4JILb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2026
स्फोटानंतर मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. ही सभा माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. या घटनेनंतर एन्.सी.पी.ने एक अधिकृत निवेदन प्रसारित करून ‘हे नियोजित आक्रमण होते’, असे म्हटले आहे. प्रशासनाने अद्याप या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेचे सर्व बाजूंनी अन्वेषण करत आहेत.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman