
‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सौ. शैलजा पाटील, जिल्हा बागलकोट, कर्नाटक.
अ. ‘मी रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्यामध्ये ‘मी वैकुंठात आले आहे’, असा भाव निर्माण झाला. मी ही भावस्थिती तीनही दिवस अनुभवत होते.
आ. मला शिबिराच्या कालावधीत केवळ ३ – ४ घंटेच झोप लागत होती, तरीही मला पहाटे ४ वाजता जाग येत होती. नंतर मी स्नान करून २ घंटे नामजप करत होते. मी नामजपादी उपाय करत असतांना माझी भावजागृती होत होती.
इ. निवासस्थानाहून बसने आश्रमात येत असतांना ‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) रथ पाठवला आहे आणि मला रथात बसण्याचे भाग्य लाभले आहे’, असे मला वाटत होते.
ई. मी आश्रमातील साधकांना पाहिल्यावर ‘ते साधक जणू देवताच आहेत आणि म्हणूनच त्यांना आश्रमात रहाण्याचे भाग्य लाभले आहे’, असे मला वाटले.
उ. मला वैकुंठधामात शिबिराला येण्याची संधी मिळाल्याबद्दल माझी गुरुचरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. माझा ‘माझे गुरुदेव, माझे गुरुदेव’ असाच जप होत होता.’
२. सौ. रत्ना संकण्णवर, गदग, कर्नाटक.
२ अ. शरीर, बॅग आणि पुस्तक यांच्यावर दैवी कण आल्याचे पाहून भावजागृती होणे : ‘मी शिबिराच्या सभागृहात बसले होते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होत होती. काही वेळानंतर ‘माझे शरीर, बॅग आणि पुस्तक यांवर दैवी कण आहेत’, असे मला दिसले. तेव्हा ‘हे सर्व गुरुदेवांच्या कृपेमुळेच झाले आहे’, असे मला जाणवले. माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘शिबिरात सूक्ष्मातून गुरूंचे अस्तित्व आहे’, याची मला जाणीव झाली.’
३. श्री. रघुनाथ गोपाळ कदम, बागलकोट, विजापूर, कर्नाटक.
३ अ. श्री भवानीदेवीची मूर्ती सजीव भासणे : ‘मी शिबिरासाठी गेल्यावर रामनाथी आश्रमाच्या परिसरातील भवानीदेवीच्या मूर्तीचे प्रतिदिन दर्शन घेत होतो. मी प्रार्थना करत असतांना ‘देवीची मूर्ती माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवत होते. त्या मूर्तीची हालचाल होत असल्याचे मला जाणवत होते. मी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेला सूक्ष्मातून उत्तर मिळत होते. मूर्तीमध्ये साक्षात् जगदंबा मातेचे सजीव रूप पाहून माझी भावजागृती होत होती. असे मला प्रतिदिन अनुभवायला येत होते.
३ आ. सत्संगात गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर भावजागृती होणे : प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सत्संगात मार्गदर्शन करत असतांना मला त्यांच्या शरिराचा रंग पूर्णपणे गुलाबी दिसला. मला प.पू. गुरुदेवांच्या कपाळावर सूक्ष्मातून भस्माच्या रंगातील त्रिशूळ स्पष्टपणे दिसत होते. मला त्यांच्या कपाळावर ‘ॐ’ स्पष्टपणे दिसत होता. गुरुदेवांचे ते रूप पाहून माझी भावजागृती होत होती आणि मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता.’
४. सौ. नागवेणी मधुसूदन, तुमकूर, कर्नाटक.
४ अ. उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांनी ‘तुम्ही गुरुदेवांवर सर्व भार सोपवून शिबिराला जा’, असे सांगून धीर देणे आणि ‘गुरुदेव सूक्ष्मातून समवेत आहेत’, अशी जाणीव होऊन आधार वाटणे : ‘रामनाथी आश्रमातील शिबिराला जाण्यापूर्वी माझी प्रकृती ठीक नव्हती. ‘मी शिबिराला जाऊ शकणार नाही’, असे सांगून माझे नाव रहित केले होते. गुरुकृपेने उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांनी मला धीर दिला. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही गुरुदेवांवर सर्व भार सोपवून शिबिराला जा.’’ त्यानंतर मी बसचे आरक्षण केले. गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि माझ्या यजमानांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. मी एकटीने प्रवास करत असतांना सतत गुरुदेवांचे स्मरण करत होते आणि ‘गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, अशी जाणीव होऊन मला आधार वाटत होता.
४ आ. शिबिरात सहभागी झाल्यामुळे माझ्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे. माझ्या नकळत मला नामजप करण्याची ओढ वाटू लागली आहे.
४ इ. शिबिराच्या दिवसांतील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अत्यंत अमूल्य होता.’
५. श्री. राजू मोगवीर, बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘माझी शिबिरासाठी निवड झाली. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. ‘मी यापूर्वी कार्यालयातून पुष्कळ सुट्या घेतल्या असल्यामुळे पुन्हा सुटी कशी मागायची ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. व्यवस्थापकांनी स्वतःहून भ्रमणभाष करून मला विचारले, ‘‘अजून किती दिवस घरून काम (वर्क फ्रॉम होम) करणार आहात ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला ३ दिवस सुटी हवी आहे.’’ त्या वेळी त्यांनी लगेच होकार दिला.
आ. मी रेल्वेचे आरक्षण केले असतांना माझा आरक्षणाच्या प्रतिक्षा यादीत (वेटिंग लिस्टमध्ये) २८ वा क्रमांक होता. त्यानंतर केवळ ३ दिवसांत माझे आरक्षण निश्चित (कन्फर्म) झाले.
इ. मला प्रवासाच्या दिवशी पाठदुखीचा त्रास होत होता. रेल्वेतील डब्यात माझ्या समोरच्या आसंदीवर बसलेले गृहस्थ स्वतःहून खाली अंथरुण घालून झोपले आणि त्यांनी मला त्यांच्या आसंदीवर झोपायला सांगितले.
‘गुरुदेवांनीच ही योजना आखली आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले. माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
६. श्री. चंद्रू इटगी, जिल्हा धारवाड, कर्नाटक.
६ अ. शिबिर असलेल्या सभागृहात बसून साधकाने प्रार्थना केल्यावर त्याला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य ! : ‘गुरुदेवांच्या कृपेने मी शिबिरात सहभागी झालो. मी सभागृहात गेल्यावर माझी गुरुदेवांच्या चरणी अत्यंत आर्ततेने प्रार्थना झाली. नंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘गुरुदेव अतिशय विशाल रूपात उभे आहेत. ब्रह्मांडातील सर्व देवता उपस्थित आहेत. त्या सभाभंडपाच्या मध्यभागी गुरुदेवांच्या समोर एक लहान मूल रडत आहे. ते मूल सनातन संस्थेच्या सर्व साधकांचे प्रतिनिधित्व करत आहे. ते मूल रडत म्हणत आहे, ‘मला लवकर दिव्य लोकात घेऊन चला. आमचा उद्धार करा, मला क्षमा करा.’ हे सर्व पहातांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कार्याप्रतीच्या साक्षीभावाचे उदाहरण !
प्रेमळ आणि गांभीर्याने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या फोंडा (गोवा) येथील सौ. सुजाता रेणके (वय ६४ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !
प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !