
फरीदाबाद (हरियाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ग्रीन फील्ड कॉलनीतील ‘स्नेह आश्रमा’त तरुण महिलांसाठी ‘स्वसंरक्षणाचे महत्त्व’ या विषयावर एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अनेक युवतींनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत स्वसंरक्षणाशी संबंधित महत्त्वाची कौशल्ये शिकून घेतली. या वेळी सहभागी झालेल्या युवतींनी आपत्कालीन परिस्थितीत स्वसंरक्षण कशा प्रकारे करावे आणि कराटे विषयक काही गोष्टी शिकून घेतल्या. याप्रसंगी सहभागी युवतींनी ‘प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला आणि सुरक्षेविषयीची जागरूकता अधिक वाढली’, असे सांगितले.

या वेळी समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी युवतींना सांगितले, ‘‘स्वसंरक्षण प्रशिक्षण केवळ शारीरिक प्रशिक्षणापुरते मर्यादित नाही, तर मानसिकदृष्ट्या सतर्क रहाणे, आत्मविश्वास बाळगणे आणि परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे यांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे.’’ या कार्यक्रमाला समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर आणि श्री. श्रेयस पिसोळकर हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह आश्रमाने हिंदु जनजागृती समितीच्या या सामाजिक आणि राष्ट्रीय कल्याणकारी उपक्रमाविषयी मनःपूर्वक आभार मानले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. ‘स्नेह आश्रमा’च्या व्यवस्थापिका सुनीता खुराना यांनी समितीच्या या उपक्रमाचे पुष्कळ कौतुक केले आणि ‘भविष्यातही आश्रमात असे कार्यक्रम आयोजित केले जावेत’, असे सांगितले.
२. आश्रमाचे संचालक श्री. अरुण मेहरा हे आजारपणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत; पण त्यांनी समितीच्या साधकांशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधून उपक्रमाविषयी आभार मानले.
जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक
Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली !
‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !
Bishnoi Gang Encounter : बिश्नोई टोळीतील २ गुंड पोलीस चकमकीत ठार
मंत्रालयाच्या बाहेरच राजकीय नेत्यांच्या अनधिकृत होर्डिंगजची उभारणी !