Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्‍या मुसलमान महिलेला अटक

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि जिवे मारण्याची धमकी

मुसलमान महिला झीनत इब्राहिम अटक

उडुपी (कर्नाटक) – रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखवून ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आणि पैशांसाठी दबाव आणून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून झीनत इब्राहिम या मुसलमान महिलेला उडुपी शहर पोलिसांनी अटक केली. ती कापू तालुक्यातील पडुबिद्रेजवळील कांचिनड्क येथील रहिवासी आहे. तक्रारदाराने दिलेली ७० लाख रुपयांची रक्कम तिने भूमी खरेदीऐवजी वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे परत मागितल्यावर झीनत हिने आणखी पैशांची मागणी केली, तसेच ते न दिल्यास कथित खासगी व्हिडिओ प्रसारित करण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

फसवणूक, गुंडगिरी, धर्मांतर अशा सर्व गुन्ह्यांत मुसलमान पुरुषांसमवेत मुसलमान महिलाही पुढे असतात, हे जाणा !