हलगर्जीपणाच्या प्रकरणी नाशिक विभागातील ११ अधिकारी निलंबित !

नाशिक – राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात हलगर्जीपणा, आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय त्रुटी यांच्या प्रकरणी ११ वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकार्‍यांमध्ये प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, लेखा अधिकारी, भंडार अधिकारी आणि विभागीय अभियंते यांचा समावेश आहे.

या सर्वांनी कामकाजातील गंभीर त्रुटी, चालक-वाहकांच्या उपस्थितीवर नियंत्रण नसणे, शिस्तभंग, तसेच प्रवाशांच्या सुविधा आणि वाहन देखभाल यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक अन्वेषणात उघड झाले.

संपादकीय भूमिका

अशी कारवाई राज्य स्तरावरील सर्वच विभागांमध्ये व्हायला हवी !