वारकर्‍यांच्या साहाय्यासाठी ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’च्या वतीने ‘वारी हेल्पलाईन’ !

पंढरपूर – आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव ! लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या वारकर्‍यांच्या सेवेसाठी शिवसेना पक्षाच्या ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’च्या वतीने यंदा ‘वारी हेल्पलाईन’ चालू करण्यात आली आहे. वारीच्या कालावधीत एखादा वारकरी हरवला, वैद्यकीय साहाय्याची आवश्यकता भासली, मार्गदर्शन हवे असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली, तर ८४५१८२३७७२ या वारी ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आणि श्री. अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वात हा सेवाभावी उपक्रम राबवला जात आहे. तरी वारीच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास वारकर्‍यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. अक्षय महाराज भोसले यांनी केले आहे.