
‘पूर्वी वाटायचे की, ‘देवाकडे जाण्यापूर्वी अधिकाधिक प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त करूया, जेणेकरून पुढील पिढ्यांसाठी ते उपयुक्त ठरेल.’ आता काळानुसार या विचारांमध्ये पालट झाला. आता वाटते की, ‘आपण आपली साधना करत रहायचे. देव आवश्यक ते ते शिकवील !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
साधना करतांना वाईट शक्तींमुळे होणारा त्रास, हे साधनेत प्रगती करत असल्याचे लक्षण !
‘वाहन चालवतांना वाहनाची गती अगदीच अल्प असल्यास चालकाला हवेचा विरोध जाणवत नाही. तसेच साधना करतांना ज्याला वाईट शक्तींच्या संदर्भात थोडीही अनुभूती आलेली नसेल किंवा त्यांच्यामुळे त्रास झालेला नसेल, तर याचा अर्थ साधना करणारा साधनेच्या प्राथमिक टप्प्यावर आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
प्रेमळ आणि गांभीर्याने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या फोंडा (गोवा) येथील सौ. सुजाता रेणके (वय ६४ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
हे म्हणे शिक्षणसम्राट !