वारीच्या तोंडावर आळंदी येथील इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे दूषित !

  • ‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह ?

  • नदी प्रदूषणावरून नाना पटोले विधानसभेत आक्रमक !

आळंदी (पुणे) – आषाढी वारी जवळ आलेली असतांनाच आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात रासायनिक सांडपाण्यामुळे पांढरा शुभ्र फेस साचला आहे. यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत, ‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नदीत रसायन सोडणार्‍या दोषी उद्योगांवर काय कारवाई करणार ? आणि लाखो वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी काय योजना आहे ? असे प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी या विषयावर तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

  • वारीच्या तोंडावर पवित्र इंद्रायणी नदीची दुरवस्था असणे, हे प्रशासकीय अनास्थेचे लक्षण आहे !
  • कोट्यवधी रुपये खर्च करूनही नदी प्रदूषितच रहात असेल, तर तो निधी गेला कुठे ? वारकर्‍यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आणि नदीत रसायन सोडणार्‍या दोषी कारखानदारांवर शासन तात्काळ गुन्हे नोंद करून कठोर कारवाई का करत नाही ?