आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’ !

मुंबई – महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म १०० वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकर्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वांत प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत आहे. शेवटच्या शेतकर्यापर्यंत कर्ज आणि विकास पोचवण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या विविध व्यक्ती संस्था आणि पदाधिकार्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी पुरस्कार’, कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’, भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर यांना ‘सहकार रत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकले यांना ‘सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथील उद्योजिका आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा वाडीकर ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्काराने सन्मानित
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
देवळाली छावणी बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत गोवंश तस्करी; कुख्यात ‘सम्राट टोळी’वर ‘मकोका’अंतर्गत कारवाई !
जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक
भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार