५ जुलै या दिवशीच्या अंकात आपण ‘प्रार्थना’ या शब्दाचा अर्थ, भक्तांनी भगवंताला प्रार्थना केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर घडणारी प्रक्रिया, तसेच प्रार्थनेचे महत्त्व आदी सूत्रे जाणून घेतली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक : https://sanatanprabhat.org/marathi/1058064.html

प्रश्न : ‘प्रार्थना करणे’, म्हणजे देवाकडे काहीतरी मागणे; पण ‘सर्व काही ईश्वराच्या इच्छेने होत असते. त्यामुळे ‘प्रार्थना’ आणि ‘ईश्वरेच्छा’ यांची सांगड कशी घालावी ? साधना करतांना किती टक्के पातळीपर्यंत प्रार्थना करणे योग्य ठरते ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
उत्तर :
५. कनिष्ठ भक्त, मध्यम भक्त आणि श्रेष्ठ भक्त यांची गुणवैशिष्ट्ये !
भक्तांच्या भक्तीच्या स्तरानुसार त्यांचे पुढील प्रकार आहेत.

टीप – भौतिक जगापासून मुक्ती आणि मोक्ष यांची कामना ही कोणत्याही प्रकारची ऐहिक कामना नसल्यामुळे तिला ‘निष्काम’ गटात गणले जाते; कारण त्यामुळे मनुष्यजन्माचे व्यष्टी स्तरावर सार्थक होते.
५ अ . व्यष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्त आणि समष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्त यांची गुणवैशिष्ट्ये !
५ अ १. व्यष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्त : व्यष्टी स्तरावरील भक्तावर केवळ सात्त्विक मायेचा प्रभाव असतो. त्यामुळे त्याला मायेतील पद, धन, प्रसिद्धी इत्यादींचा फोलपणा लक्षात आलेला असतो. त्यामुळे तो मायेतील कोणत्याही गोष्टीची किंवा प्रलोभनाची कामना करत नाही. याउलट तो ‘ईश्वराला अपेक्षित असे धर्माचरण आणि मुक्ती किंवा मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी शुद्ध साधना होऊ दे किंवा गुरुकृपा, तसेच ईश्वरी कृपा होऊ दे’, अशी भगवंताला प्रार्थना करत असतो.
५ अ २. समष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्त : समष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्ताचा ‘मी’पणा पूर्णपणे गळून गेल्यामुळे तो स्वतःसाठी ऐहिक किंवा पारमार्थिक उपलब्धींच्या पूर्तीसाठी प्रार्थना न करता समष्टीसाठी प्रार्थना करतो. त्याने समस्त सांसारिक, म्हणजे भौतिक सुखांचा त्याग केलेला असतो. असे भक्त विश्वकल्याणासाठी अखंड झटत असतात. ते विश्वाच्या कल्याणासाठी किंवा उद्धारासाठी समष्टी गुरु किंवा ईश्वर यांना प्रार्थना करतात.
५ आ. व्यष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्त आणि समष्टी स्तरावरील श्रेष्ठ भक्त यांच्यातील भेद !

६. परात्पर गुरु पदावर पोचल्यावर स्वेच्छा पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे ‘प्रार्थना’ करण्याचे महत्त्व लोप पावत असणे
९० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर स्वेच्छेचा लय होऊन ईश्वरेच्छा १०० टक्के लागू होऊ लागते. त्यामुळे ९० टक्के पातळीच्या पुढे स्वेच्छारूपी ‘प्रार्थना’ करणे ईश्वराला अपेक्षित नसते. अशा वेळी जर परिस्थिती, स्थळ किंवा काळ हे धर्माचरण आणि व्यष्टी स्तरावर मोक्षप्राप्ती किंवा समष्टी स्तरावरील धर्मराज्य यांच्यासाठी अनुकूल असतील, तर कोणत्याही प्रकारच्या भक्ताने भगवंताला कोणतीही प्रार्थना करू नये.
| ऐकावी आमची विनम्र प्रार्थना !
झाडाचे पानही हलते, ईश्वराच्या इच्छेनेच ।। १ ।। ![]() आध्यात्मिक उत्कर्ष होतो, श्री गुरुकृपेनेच ।। २ ।। षड्रिपूंनी ग्रस्त झालेल्या जिवाला, होतात अनेक यातना ।। ३ ।। ‘आम्हास भवसागरातून तारून न्यावे’, हीच करतो आम्ही तव चरणी आर्त याचना ।। ४ ।। ‘श्री गुरूंची कृपा व्हावी’, यासाठी करतो भावार्चना ।। ५ ।। श्री गुरुचरणी नतमस्तक होऊन, करतो आम्ही भक्तीवंदना ।। ६ ।। ‘आम्हावर अखंड गुरुकृपा व्हावी’, करतो हीच आर्त प्रार्थना ।। ७ ।। शरण तुला, हे गुरुरूपी भगवंता । ऐकावी आमची ही विनम्र प्रार्थना ।। ८ ।। – सुश्री मधुरा भोसले |
७. आपत्कालीन परिस्थितीत ईश्वराच्या निष्काम भक्तांनी ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ या पुरुषार्थांच्या रक्षणासाठी भगवंताला प्रार्थना करून साकडे घालणेही ईश्वराला अपेक्षित असणे अन् येथेच ‘ईश्वरेच्छा स्वीकारणे अन् ईश्वराला प्रार्थना करणे’ यांची सांगड घातली जाणे
जर परिस्थिती, स्थळ किंवा काळ हे धर्माचरण आणि व्यष्टी स्तरावर मोक्षप्राप्ती किंवा समष्टी स्तरावरील धर्मराज्य यांच्यासाठी प्रतिकूल असतील, तर सर्व प्रकारच्या भक्तांनी स्वत:चा, समाजाचा आणि राष्ट्राचा धर्म बुडण्यापासून वाचवण्यासाठी अन् पारमार्थिक पतन न होता पारमार्थिक उत्कर्ष होण्यासाठी भगवंताला प्रार्थना करणे, ही सर्वाेत्तम साधना/ईश्वरेच्छा असते. याचे कारण असे की, धर्माच्या ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’, यांची निर्मिती स्वतः ईश्वराने केलेली असून यांतील ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ या दोन्ही पुरुषार्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या रक्षणासाठी स्वतः भगवंत साक्षीभाव सोडून पृथ्वीवर अवतरित होत असतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत निष्काम भक्तांनी स्वत:चे आणि राष्ट्राचे रक्षण होण्यासाठी अन् ‘धर्म’ आणि ‘मोक्ष’ या पुरुषार्थांच्या रक्षणासाठी भगवंताला प्रार्थना करून साकडे घालणेही ईश्वराला अपेक्षित आहे.
८. सांप्रत काळात व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर आध्यात्मिक उत्कर्ष होण्यासाठी ‘ईश्वरेच्छा स्वीकारणे अन् ईश्वराला प्रार्थना करणे’ यांची सांगड घालून ‘प्रत्येक सात्त्विक जीव, निष्काम भक्त आणि सर्व आध्यात्मिक उन्नत यांनी ईश्वराला प्रार्थना करणे’, ही सर्वाेत्तम ईश्वरभक्ती असणे
कलियुगाचा हा काळ हिंदु धर्मानुसार आचरण करण्यास, म्हणजे व्यष्टी आणि समष्टी स्तरावर धर्माचरण करण्यास, तसेच व्यष्टी स्तरावर मोक्षप्राप्ती अन् समष्टी स्तरावर धर्मराज्याची स्थापना करण्यास अत्यंत प्रतिकूल आहे. अशा प्रकारे आता व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर घोर आपत्काळ चालू आहे. या घोर आपत्काळात जिवंत राहून ईश्वराला अपेक्षित असे धर्माचरण आणि साधना करणेही कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत व्यष्टी स्तरावर आध्यात्मिक उन्नती करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करण्याविना अन्य उपाय नाही. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर आध्यात्मिक उत्कर्ष होऊन ‘सुराज्य आणि धर्मराज्य’ यांचे संयुक्त रूप असलेले ‘रामराज्य’ स्थापन होण्यासाठी प्रत्येक सात्त्विक जीव, निष्काम भक्त आणि आध्यात्मिक उन्नत या सर्वांनी ‘ईश्वराला प्रार्थना करणे’, ही सर्वाेत्तम ईश्वरभक्ती आहे; कारण अशी प्रार्थना ही जिवाच्या अहंचा संपूर्णपणे लय होऊन भगवंताला संपूर्णपणे शरण गेलेली उच्चतम आध्यात्मिक अवस्था दर्शवते. या अवस्थेच्या पुढे जिवाचे अस्तित्व संपून केवळ शिवरूपी ईश्वराचे दिव्य अस्तित्व कार्यरत होते. याच स्थितीला जीव-शिव यांचे मीलन होऊन जिवाला व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर ‘अद्वैत अवस्था’ प्राप्त होते.
११. कृतज्ञता
वरील ज्ञानसूत्रांतून ईश्वरी कृपेनेच मला ‘प्रार्थना करण्याचे महत्त्व’ आणि त्यामुळे प्राप्त होणारी ‘अद्वैत अवस्था’ यांचे महत्त्व उमजले. त्याबद्दल मी गुरुरूपी ईश्वराच्या चरणी कोटी कोटी वेळा नमन करून कृतज्ञतापुष्प समर्पित करते. ‘आम्हा सर्व साधकांचा व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर उद्धार होण्यासाठी भगवंताची कृपा आम्हा साधकांवर अशीच अखंड राहो’, हीच त्याच्या चरणी विनम्रभावाने प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १०.३.२०२६, वेळ : दुपारी २.३० ते ४ आणि कालावधी १ घंटा ३० मिनिटे) ॐ

व्यक्ती-स्वातंत्र्यवाल्यांचे हे अज्ञानच !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे !
प्रेमळ आणि गांभीर्याने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या फोंडा (गोवा) येथील सौ. सुजाता रेणके (वय ६४ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात स्वतःच्या कार्याविषयी येत असलेल्या विचारांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !