Cow Slaughter : गायीची मान कापणार्‍या ४ धर्मांधांना अटक

शिवमोग्गा (कर्नाटक) – जिल्ह्यातील होसनगर तालुक्यातील पटगुप्पा पुलाजवळ गायीची मान कापल्याच्या प्रकरणी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. महंमद सलीम बाळूर, मकबूल अहमद बडीगेर, सुलेमान कोलारी आणि मल्लिक रिहान, अशी त्यांची नावे असून ते सर्व जण हावेरी जिल्ह्यातील हानगल तालुक्यातील अक्की आलूरु गावातील रहिवासी आहेत.

होसनगर तालुक्यातील होसकोप्पा गावाजवळील पटगुप्पा पुलाजवळ काही समाजकंटकांनी मांस विक्रीच्या उद्देशाने गाय आणि वासरू यांची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी होसनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गोपालकृष्ण यांनी दिलेल्या तक्रारीवरून ‘कर्नाटक जनावरे हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा’, तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून  विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण चालू करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

असे कृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी शिक्षा अशा आरोपींना सरकारने दिली पाहिजे ! अर्थात् कर्नाटकात आतंकवाद्यांची सुटका करणारे मुसलमानप्रेमी काँग्रेसचे सरकार असल्याने या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार कितपत प्रयत्न करील, याविषयी शंकाच आहे !