Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली  !

खराब झालेल्या ‘हेडलाईट’च्या दुरुस्तीकडे परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष !

भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात चालवली बस

कलबुर्गी (कर्नाटकात) – कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसच्या चालकाने भ्रमणभाषच्या टॉर्चच्या (विजेरीच्या) प्रकाशात बस चालवल्याची धक्कादायक घटना कलबुर्गी ते चिंचोळी मार्गावर घडली. या बसच्या वाहकाने (कंडक्टरने) भ्रमणभाषचा टॉर्च समोर धरला, तर चालकाने त्या प्रकाशातच ९० कि.मी. बस चालवली.

गेल्या १५ दिवसांपासून या बसचे ‘हेडलाईट’ खराब असूनही परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी ते दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले नाही. परिवहन अधिकार्‍यांच्या या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून काही अनुचित प्रकार घडल्यास उत्तरदायी कोण ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधितांनी तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

प्रवाशांच्या जिवाशी खेळणार्‍या सर्व उत्तरदायींना सरकारने तात्काळ निलंबित केले पाहिजे !