‘निज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी (६.७.२०२६) या दिवशी सौ. सुजाता रेणके यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. अशोक रेणके यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. सुजाता रेणके यांना ६४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सतत कार्यरत रहाणे
‘सौ. सुजाता हिची प्रकृती नाजूक असूनही ती घरातील सर्व कामे करण्याचा प्रयत्न करते. ती विविध प्रकारचे अन्नपदार्थ बनवते. ती घराची स्वच्छता करण्यात रमते. ती नियमित अर्धा घंटा व्यायाम करते.
२. प्रेमभाव

आम्ही रहात असलेल्या इमारतीच्या आवारात जाऊन ती देवपूजेसाठी विविध प्रकारची फुले काढून आणते. मोगरा, जाई, चाफा, अशी फुले उपलब्ध असल्यास ती फुले काढून आणते आणि त्यांचे सुंदर गजरे बनवते. तेव्हा ती स्वत:साठी ते गजरे न ठेवता आश्रमातील साधिकांना देते. तेव्हा तिला पुष्कळ आनंद होतो. तिने घरी काही खाऊ बनवल्यास ती तो खाऊ साधकांना विशेषतः पूर्णवेळ साधना करणार्या साधकांना देते.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
तिचे नेहमी व्यष्टी साधनेकडे लक्ष असते. ती कितीही व्यस्त असली, तरीही नियमित सारणीत आणि फलकावर चुका लिहिते. ती स्वयंसूचना सत्रे करते. ती समष्टीमध्ये स्वत:कडून झालेल्या चुका सांगून क्षमायाचना करते. आम्ही आश्रमात आल्यानंतर ती नामजपादी उपाय गांभीर्याने पूर्ण करते. ती तिची प्रकृती सांभाळून सकाळी लवकर उठून नामजप करते. तिला शारीरिक त्रास होत असल्यास ती नामजपादी उपाय विचारून घेऊन ते पूर्ण करते.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रार्थना करून भावपूर्णरित्या अग्निहोत्र करणे
तिला घरी अग्निहोत्र करण्याचे महत्त्व समजल्यावर ती प्रतिदिन अग्निहोत्र करते. आम्ही आश्रमात सेवेला जात असल्यामुळे आम्हाला संध्याकाळी अग्निहोत्र करणे शक्य होत नाही. आम्ही घरी असतांना ती सायंकाळीही अग्निहोत्र करते. ती अग्निहोत्र करतांना भावपूर्ण श्लोक म्हणत आहुती देते. ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु यांचे स्मरण करून त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करते. तिने अग्निहोत्र केल्यानंतर घरातील वातावरणात प्रसन्नता जाणवते.
५. शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ
ती मराठी भाषेतील लेखांचे कन्नड भाषेत भाषांतर करण्याची सेवा करते. ती ही सेवा १० वर्षांपासून करत आहे. ती सेवेला प्राधान्य देते. तिला संगणकीय सेवा शिकायला पुष्कळ आवडते. तिचा संगणकीय सेवेतील बारकावे शिकण्याकडे कल असतो. ती पुष्कळ गतीने टंकलेखन करते. ती सेवा वेळेत पूर्ण करून उत्तरदायी साधकांना पाठवते आणि त्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवते. अलीकडे ‘ए.आय.’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) युग चालू झाल्यामुळे आता ती ‘ए.आय.’ला प्रश्न विचारून शब्दांचे अर्थ समजून घेऊन भाषांतर सेवा पूर्ण करते. आता ती पूर्वीपेक्षा गतीने सेवा करते. पूर्वी तिच्याकडून एकच धारिका होत होती. आता तिच्या दिवसभरात २ – ३ धारिका होतात. पूर्वी तिच्याकडून सेवेत पुष्कळ चुका होत असत. आता ती चुकाविरहित सेवा करण्याचा प्रयत्न करते.
६. तिची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद्गुरु आणि संत यांच्यावर श्रद्धा आहे.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मी ही सूत्रे लिहू शकलो’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अशोक रेणके (सौ. रेणके यांचे यजमान, वय ६७ वर्षे), पाटणतळी, फोंडा, गोवा. (१६.६.२०२६)
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कार्याप्रतीच्या साक्षीभावाचे उदाहरण !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !
प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !