
भंडारा – कत्तलीसाठी गोवंशियांची अनधिकृत आणि तस्करी करणार्या, तसेच भंडारा, गोंदिया अन् नागपूर जिल्ह्यांत गुन्हेगारी कारवायांद्वारे दहशत निर्माण करणार्या कुख्यात ‘सम्राट टोळी’विरुद्ध ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी टोळीविरुद्ध ‘मकोका’ कायद्याचे कलम वाढवण्याचे आदेश दिले आहेत. टोळीप्रमुख सम्राट येवले (वय ३३ वर्षे) आणि त्याचे साथीदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
वाहनात आढळले १४ गोवंश; एकाचा गुदमरून मृत्यू !
२१ जून या दिवशी लाखनी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली होती. एका संशयास्पद पिकअप वाहनाची पडताळणी केली असता त्यात अत्यंत निर्घृणपणे कोंडलेले १४ गोवंश आढळले. त्यातील एका निष्पाप जनावराचा गुदमरून मृत्यू झाला होता. पोलिसांना पहाताच टोळीप्रमुख सम्राट येवले वाहन सोडून पळाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या टोळीविरोधात एकूण ९ गुन्हे नोंद आहेत.
कोल्हापूर येथील उद्योजिका आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा वाडीकर ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्काराने सन्मानित
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
देवळाली छावणी बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
केंद्र आणि राज्य यांच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार
Cow Slaughter : गायीची मान कापणार्या ४ धर्मांधांना अटक