प्रयागराज उच्च न्यायालयात हिंदूंकडून याचिका : १०९ पुरावे असल्याचा दावा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील ‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ आहे, हे सिद्ध करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ही याचिका ‘भगवान श्री अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान’ यांच्या वतीने अधिवक्ता पू. हरि शंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह ५ जणांनी प्रविष्ट केली आहे. अधिवक्ता पू. हरि शंकर जैन वाराणसीतील ज्ञानवापीच्या प्रकरणातही हिंदूंच्या बाजूने न्यायालयीन लढाई देत आहेत.

१. या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहाल’ हा भगवान शिवाला समर्पित असलेला ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदु पुरावे/प्रतीके ही सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आगर्याच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. या आदेशात ताजमहालतील हिंदु प्रतीकांच्या पडताळणीसाठी सर्वेक्षण करण्यास नकार देण्यात आला होता.

२. हे प्रकरण वर्ष २०१५ मध्ये प्रारंभ झाले होते. त्या वेळी आगर्याच्या दिवाणी न्यायालयात एक दिवाणी खटला प्रविष्ट करण्यात आला होता. त्याद्वारे ताजमहाल परिसर हा प्रत्यक्षात तेजोमहालय, म्हणजेच तेजोलिंग महादेव मंदिर आहे, जिथे भगवान महादेव नागनाथेश्वर विराजमान आहेत, असे सांगण्यात आले होते. तसेच हिंदूंना ताजमहालमध्ये पूजा करण्याची अनुमती देण्याचीही मागणी करण्यात आली होती.
३. यानंतर पुन्हा वर्ष २०१९ मध्ये याचिकाकर्त्यांनी अर्ज सादर करून ताजमहालची पहाणी करण्याची आणि त्याच्या रचनेची छायाचित्रे काढण्याची आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एका ‘अधिवक्ता आयुक्तां’ची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. तथापि याचिकाकर्ते ताजमहालची ओळख पटवणारे महसूल अभिलेख (रेव्हेन्यू रेकॉर्ड्स) सादर करू शकले नाहीत, असे सांगत न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.
फरीदाबाद (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडले ‘स्वसंरक्षण’विषयक व्याख्यान अन् प्रशिक्षण !
जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक
Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली !
Bishnoi Gang Encounter : बिश्नोई टोळीतील २ गुंड पोलीस चकमकीत ठार
एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व किंवा तिचे परदेशी नाव तिची हिंदु धर्मावरील श्रद्धा ठरवू शकत नाही ! – Madras High Court
POK Protest : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाला काश्मीरमधील नागरिकांनी पाठिंबा द्यावा !