
१. वर्ष २००६ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विचार
२४.१२.२००६ या दिवशी माझ्या लक्षात आले, ‘देवता आणि ईश्वर अनादि काळापासून कार्यरत असतांना मी निवृत्तीचा विचार करणे किती चुकीचे आहे !’ आणि त्याबद्दल मला खंत वाटली.

१ अ. वर्ष २०१३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विचार
५.५.२०१३ पासून मला पृथ्वीवरच्या जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटते. याचे कारण काय ? वरील विचाराच्या पुढच्या टप्प्याचा हा विचार आहे का ? संत ज्ञानेश्वर इत्यादींनी समाधी घेऊन त्यांचे आयुष्य संपवले. तसे माझ्याकडून होणार आहे का ?
२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. वर्ष २००६ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आध्यात्मिक स्थिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी पुष्कळ साधनेद्वारे अध्यात्मातील सर्वाेच्च स्थिती, म्हणजे ईश्वरप्राप्ती साध्य केली आहे. त्यांना ‘सर्वकाही ईश्वरच करत आहे’, याची सतत जाणीव असते. त्यांच्यात कार्य करण्याचा अहं उरला नाही; म्हणून त्यांच्या मनात निवृत्तीचा विचार आला. नंतर त्यांना ईश्वरी प्रेरणेद्वारे समजले, ‘त्यांच्या अस्तित्वानेच ईश्वरी कार्य घडणार असून त्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता आहे आणि ‘असे होणे’, हा ईश्वरी नियोजनाचा एक भाग आहे.’ त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘देवता आणि ईश्वर अनादि काळापासून कार्यरत असतांना मी निवृत्तीचा विचार करणे किती चुकीचे आहे आणि त्याबद्दल मला खंत वाटली’, असे म्हटले आहे.
२ आ. वर्ष २०१३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आध्यात्मिक स्थिती
वर्ष २००१ पासून ते वर्ष २०१३ या कालावधीत सप्तपाताळांतील वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या धर्मकार्याला विरोध करण्यासाठी त्यांच्यावर सूक्ष्मातून मोठी आक्रमणे केली आणि त्यांना प्रतिकूल काळाचीही साथ मिळाली. या कालावधीपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि सप्तपाताळांतील वाईट शक्ती यांच्यात सूक्ष्मातून तुंबळ युद्ध अजूनही चालू आहे. त्या वाईट शक्तींची सहस्रो वर्षांची आसुरी साधना असल्याने या सूक्ष्म युद्धाचे स्वरूप अतिशय भीषण असते. या सूक्ष्म युद्धामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘पुष्कळ थकवा येणे, प्राणशक्ती अल्प होणे, गुंगी येऊन अनावर झोप येणे’ इत्यादी त्रास सतत होत असतात. या सूक्ष्म युद्धाचा परिणाम म्हणून ५.५.२०१३ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना पृथ्वीवरच्या जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटायला आरंभ झाला.
२ इ. संत ज्ञानेश्वर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचे कार्य
संत ज्ञानेश्वरांनी साधनेने ईश्वरप्राप्ती साध्य केली. त्यांनी प्रामुख्याने ग्रंथ लिखाणाद्वारे ज्ञानकार्य केले. या कार्याची पूर्ती झाल्यावर त्यांनी समाधी घेतली.
‘साधकांची आध्यात्मिक प्रगती करून घेणे, ज्ञानकार्य करणे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची कार्ये आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे सप्तपाताळांतील वाईट शक्तींचा जोर न्यून होतो. या वाईट शक्तींचा सूक्ष्मातील अडथळा दूर झाला की, त्याचा परिणाम म्हणून भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. सूक्ष्मातील हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या अस्तित्वाने होत आहे. जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयीचे सूक्ष्मातील कार्य संपेल, तेव्हा ते देहत्याग करतील.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ७.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !
जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधिकेला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मुलगा विदेशात असणे’, ही अभिमानाची नाही, तर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण आणि महत्त्व !