
मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत अजित पवार यांची जयंती यानिमित्त नागरिकांना केंद्र आणि राज्य शासन यांच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘महाराजस्व’ अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक भव्य शासकीय शिबीर राबवले जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येक १० लाख रुपये दिले जाणार आहेत. २२, २५ किंवा २६ जुलै या दिवसांतील कोणत्याही एका दिवशी हे शिबीर घेतले जाणार आहे. यामध्ये महिला शेतकर्यांना ओळखपत्र देणे, गावठाणांची सनद वाटप हे होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ९ जुलै या दिवशी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !