सीमाभागातील प्रश्न सोडवणे हेच प्राधान्य ! – नारायण राणे, खासदार, भाजप 

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुंबईत झालेल्या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवणे हेच सरकारचे मुख्य प्राधान्य असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. या विषयावर लवकरात लवकर ठोस मार्ग काढणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या महत्त्वाच्या बैठकीत सीमाभागातील मराठी रहिवाशांना कायदेशीर साहाय्य देण्यासह हा लढा अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयामध्ये लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.