मिरजच्या जवाहर चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारा ! – विनायक सूर्यवंशी, मिरज शहरप्रमुख, शिवसेना

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते

मिरज (जिल्हा सांगली) – मिरज शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, जवाहर चौक येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा स्मारक उभारण्यासाठी जागा आरक्षित करून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख श्री. विनायक सूर्यवंशी यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जवाहर चौक हा मिरज शहरातील मध्यवर्ती आणि महत्त्वाचा चौक असून येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारल्यास त्यांच्या शौर्य, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मरक्षण यांच्या कार्याचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढीपर्यंत प्रभावीपणे पोचेल. या वेळी महानगरप्रमुख श्री. मोहन वनखंडे, शिवसेनेचे नगरसेवक श्री. सागर वनखंडे, मिरज शहरप्रमुख श्री. किरण राजपूत, सर्वश्री प्रकाश अहिरे, गजानन मोरे, विजय शिंदे, अक्षय मिसाळ, विशाल धुळूबुलु यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.