Pakistan Threatens India : (म्हणे) ‘भारताने पाणी रोखले, तर अणूयुद्ध होईल !’ – माजी संरक्षणमंत्री, पाक

सिंधु जल वाटप करार भारताने रहित केल्याचे प्रकरण

पाकिस्तानचे माजी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री खुर्रम दस्तगीर खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानकडे येणार्‍या पाण्याचा नळ बंद केला, तर आम्ही ते कधीही सहन करणार नाही. जर भारताने पाणी रोखले आणि जगाने यात मध्यस्थी केली नाही, तर कदाचित् हे पाण्यावरून होणारे जगातील पहिले अणूयुद्ध असेल. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज शेजारी आहेत. आपण एकमेकांच्या इतके जवळ आहोत की, एकदा का क्षेपणास्त्र डागले गेले, तर आपल्याकडे विचार करण्यासाठीही वेळ उरणार नाही. परिस्थिती अणूयुद्धापर्यंत पोचू शकते आणि असे झाल्यास पाकिस्तान याचे चोख उत्तर देईल, अशी धमकी पाकिस्तानचे माजी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी सिंधु जल वाटप करार भारताने रहित केल्यावरून एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलतांना दिली.

संपादकीय भूमिका

‘पाकिस्तानकडे असलेले अणूबाँब फुटू शकतात का ?’, असा प्रश्न जगाला आहे. जर पाकला अणूयुद्धाची इतकीच खुमखुमी असेल, तर त्याने ते करून पहावेच !