खेड-राजगुरुनगर येथे शासकीय जागेवरील अनधिकृत मजार हटवली

प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवशंकर स्वामी आणि सकल हिंदु समाज यांच्या पाठपुराव्यामुळे जागा अतिक्रमणमुक्त

अनधिकृत मजार हटवली

खेड-राजगुरुनगर (पुणे) – येथील शासकीय विश्रामगृहाच्या दीड गुंठे जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत मजार प्रशासनाने हटवली असून ही शासकीय जागा आता पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. विविध हिंदु संघटना आणि सकल हिंदु समाज यांनी गेल्या ३ वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

शासकीय विश्रामगृहाच्या जागेवर अनधिकृतपणे मजार उभारून ती जागा बळकावण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाला सर्वप्रथम ‘सुदर्शन न्यूज’ने वाचा फोडली होती. त्यानंतर प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवशंकर स्वामी यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

प्रशासनाने या तक्रारींची नोंद घेत प्रकरणाची सखोल चौकशी केली. सर्व कायदेशीर गोष्टी पडताळल्यानंतर, अखेर प्रशासकीय यंत्रणेने ही अनधिकृत मजार आणि इतर अतिक्रमणे मुळासकट काढून टाकली. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. या विजयाविषयी आनंद व्यक्त करतांना श्री. शिवशंकर स्वामी म्हणाले की, आम्ही याविरुद्ध कायदेशीर लढा दिला आणि प्रशासनाने सर्व माहिती घेऊन हा अनधिकृत दर्गा हटवला, त्याविषयी आम्ही त्यांचे आभार मानतो.

संपादकीय भूमिका

        शासकीय विश्रामगृहाच्या दीड गुंठे जागेवरील हे अनधिकृत बांधकाम, म्हणजे सरकारी भूमी बळकावण्याच्या संघटित ‘लँड जिहाद’चाच प्रकार आहे. शासकीय विश्रामगृहाच्या आवारात हे बांधकाम होतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काय झोपले होते का ? सामान्य माणसाला जिथे सहजासहजी प्रवेश मिळत नाही, अशा ठिकाणी हे बांधकाम झालेच कसे ?