कळंगुट पोलिसांची मंगळुरूमध्ये कारवाई

पणजी, ३ जुलै (वार्ता.) – कॅसिनोमध्ये ओळख वाढवून श्रीमंत व्यक्तींना मोहात पाडून लुबाडणारी आणि उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक संदीप सुवर्णा (वय ४२ वर्षे) यांच्या मृत्यूच्या प्रकरणी पसार असलेली अक्षता उपाख्य रूपाश्री सी. या महिलेला कळंगुट पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या साहाय्याने मंगळुरू येथे कह्यात घेतले. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ३० जून या दिवशी कळंगुटमधील एका रिसॉर्टच्या (निवासी हॉटेल) खोलीत संदीप सुवर्णा यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेच्या दिवशी ही संशयित महिला त्यांच्यासमवेत त्याच खोलीत होती. तिने संदीप यांना गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले आणि त्यांची सोनसाखळी आणि पैसे असलेले पाकीट पळवले, असा संशय आहे.
संशयित महिला गोव्यातून मंगळुरू येथे गेल्याची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांचे पथक १ जुलै या दिवशी कर्नाटकात मार्गस्थ झाले. या पथकाने तेथील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने कसून शोध घेतल्यानंतर ३ जुलै या दिवशी कळंगुट पोलिसांनी संशयित महिलेला कह्यात घेतले. तिला घेऊन पोलीस पथक गोव्यात येणार असून तिची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. संदीप यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ चेतन याने दिलेल्या तक्रारीवरून कलम १२३, ३०९ आणि १०३(१) अंतर्गत हत्या केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात गुजरात येथील पर्यटक लोमेश यादव यांनाही तिने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले होते आणि त्यांच्याकडून २ लाख ४० सहस्र रुपये आणि १५ लाख ४० सहस्र रुपये किमतीचे दागिने लांबवले होते आणि त्यानंतर ती महिला पसार झाली होती. यादव यांनी या महिलेविरुद्ध तक्रार केली होती.
बेळगाव-गोवा मार्गावरील खानापूर ते अनमोडपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण
पॅरोल घेऊन पसार झालेल्या हत्येमधील आरोपीस ४ वर्षांनंतर अटक !
आषाढी वारीसाठी १ सहस्र ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० सहस्र रुपयांचे अनुदान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा रथ !
पावसाळ्यात झाडे पडणे, ही मानवनिर्मित आपत्ती ! – अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान
चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !