तळोजा येथे ठाकरे गट आक्रमक !

ए आय निर्मित चित्र पनवेल – तालुक्यातील मोवे वाजे (तळोजा एम्.आय.डी.सी.) येथे प्रस्तावित असलेल्या पशूवधगृहाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले आहेत. या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमीच्या मोजणी प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन ही मोजणी तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट मोजणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे. हा प्रकल्प श्री स्वामी समर्थ मठ आणि मंदिर यांच्या परिसरात येत असल्याने भाविकांमध्येही मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
स्थानिकांच्या मते हा परिसरातील नागरिक आधीच सिडको डम्पिंग ग्राउंड (कचरा साठवण्याची जागा), मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि गाढी नदीचे प्रदूषण यांमुळे त्रस्त असून या सर्वांमुळे येथील भूजल आणि विहिरी यांचे पाणी दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत येथे पशूवधगृह उभारल्यास तीव्र दुर्गंधी, पर्यावरणीय प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, तसेच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या पशूवधगृहाला आणि भूमी मोजणीला तीव्र विरोध करण्याची ठाम चेतावणी दिली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मालवण शहरातील नागरिक त्रस्त
पॅरोल घेऊन पसार झालेल्या हत्येमधील आरोपीस ४ वर्षांनंतर अटक !
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू !
मुसळधार पावसामुळे तुर्भे येथे रहिवासी वस्तीत पाणी तुंबले !
बलात्कारी आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !
मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची उपाययोजना करणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री