‘सनातन प्रभात’ने मांडलेल्या समस्येवर आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उठवला आवाज !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – विधानभवनाच्या आवारात मोडकळीस आलेल्या अनेक भंगार गाड्या पडल्या आहेत. यामध्ये घोडागाडी, चारचाकी गाड्या यांचा समावेश आहे. या गाड्या वाहतूक विभागाने उचलाव्यात, असे आवाहन शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केले. ‘सार्वजनिक महत्त्वाच्या समस्ये’च्या अंतर्गत हे सूत्र डॉ. मनीषा कायंदे यांनी सभागृहात उपस्थित केले.
‘महाराष्ट्र विधान परिषद नियम २६०’ अंतर्गत सार्वजनिक महत्त्वाच्या समस्याच्या सभागृहात मांडता येतात. सरकारकडून हे विषय संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवले जातात. विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ असे ३६६ आमदार आहेत. या सर्व आमदारांच्या गाड्या विधानभवनाच्या वाहनतळामध्ये लावण्यास जागा अपुरी पडते. त्यामुळे विधानभवनाच्या परिसरातील रस्ते आणि जागा वाहतूक पोलीस गाड्यांसाठी राखीव ठेवतात. आमदारांच्या गाड्यांसह मंत्री, प्रशासकीय अधिकारी या सर्वांची शेकडो वाहने आणि त्या तुलनेत अपुरी जागा यांमुळे अनेकदा वाहने लावण्यावरून वादही होतात. हे लक्षात घेऊन आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी वाहनतळावरील भंगारच्या गाड्या हालवल्यास तेथे गाड्या लावण्यास अधिक जागा उपलब्ध होईल, हे सभागृहाच्या लक्षात आणून दिले.
२४ जून या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये पृष्ठ १ वर ‘विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने’ हे वृत्त ठळकपणे दिले होते. वाहनांमुळे येत असलेल्या विविध समस्या आणि निर्माण होणारा सुरक्षेचा गंभीर प्रश्न मांडण्यात आला आहे. या वृत्ताचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक डॉ. मनीषा कायंदे यांना देण्यात आला होता. डॉ. मनीषा कायंदे यांनी वाहनतळावरील भंगार गाड्यांच्या छायाचित्राची प्रत आणि त्या समवेत दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताची प्रत सभापती सचिन अहिर यांच्याकडे सुपूर्द केली.
धनाढ्यांना मोहात पाडून त्यांना लुबाडणार्या संशयित महिलेला अटक
बेळगाव-गोवा मार्गावरील खानापूर ते अनमोडपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण
आषाढी वारीसाठी १ सहस्र ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० सहस्र रुपयांचे अनुदान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा रथ !
पावसाळ्यात झाडे पडणे, ही मानवनिर्मित आपत्ती ! – अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान
चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !