
बँकॉक (थायलंड) – थायलंडच्या ईशान्य भागात २ जुलै या दिवशी ११ वर्षीय मुलाचा ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ९ बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला. यासह अनेक जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले आहे. बाल संरक्षण अधिकार्यांच्या उपस्थितीत त्याचे अन्वेषण केले जाणार आहे.
Tragic news from Thailand.
At least 8 Buddhist monks have been killed and several injured after an 11-year-old boy crashed his parents' pickup truck into a religious pilgrimage procession in Mukdahan province.
CCTV footage captured the heartbreaking moment. 🙏🍂#Thailand… pic.twitter.com/oTUgG07RUt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 3, 2026
१. मुकदाहान प्रांतातील ३५ बौद्ध भिक्षू २६० किलोमीटर लांबीच्या पायी तीर्थयात्रेला निघाले होते. यात्रा चालू झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांतच हा अपघात झाला.
२. ५ भिक्षूंचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जणांचा रुग्णालयात उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. १३ घायाळ भिक्षूंना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
३.बौद्ध भिक्षू रस्त्याच्या कडेला एका रांगेत चालत असतांना सदर मुलाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि या ट्रकची भिक्षूंना धडक बसली. अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
क्षेपणास्त्रांना अफगाणी दरोडेखोरांची नावे दिल्यावरून पाकला पडला पेच !
Pakistan Threatens India : (म्हणे) ‘भारताने पाणी रोखले, तर अणूयुद्ध होईल !’ – माजी संरक्षणमंत्री, पाक
खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आक्रमण केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – Iran
Rajasthan ATS Raid : राजस्थानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्याशी संबंध असणार्या २८ संशयितांना अटक
पाक सैन्याने काश्मिरींना शस्त्रे दिली ! – POK Leader
Bangladeshi Infiltrators Arrest : बंगालमध्ये ९ बांगलादेशी घुसखोरांना अटक !