Rajasthan ATS Raid : राजस्थानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्याशी संबंध असणार्‍या २८ संशयितांना अटक

पाकिस्तानी आतंकवादी शहजाद भट्टी

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या आतंकवादविरोधी पथकाने  राज्यातील २० हून अधिक शहरात धाडी घालून २८ संशयितांना अटक केली. हे पाकिस्तानी आतंकवादी शहजाद भट्टी याच्याशी संबंधित आहेत. भट्टी सामाजिक माध्यमांद्वारे पैसे आणि प्रसिद्धी यांचे आमीष दाखवून त्यांच्याशी मैत्री करतो आणि नंतर त्यांच्याकडून संवेदनशील ठिकाणांचे छायाचित्रे मागवतो. भट्टीच्या जाळ्यात बहुतेक भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील तरुण अडकत आहेत.

पकडलेल्या लोकांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांची आणि इतर ऑनलाईन कृतींची चौकशी केली जात आहे. अन्वेषण यंत्रणांनुसार भट्टी याने राजस्थानसमवेत  हरियाणा, पंजाब, देहली आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्येही ‘स्लीपर सेल’चे (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट) जाळे सक्रीय केले आहे. यांना हवालाद्वारे (अरबी आणि दक्षिण आशिया येथील देश पैशांचे हस्तांतर करण्यासाठी वापरत असलेली एक विशिष्ट प्रणाली) पैसे पोचवले जातात.

संपादकीय भूमिका

जोपर्यंत पाकिस्तान आहे, तोपर्यंत भारताला शांतता लाभू शकत नाही, हे लक्षात घेता भारताने पाकला नष्ट करणेच आवश्यक आहे !