
आळंदी – ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’च्या वतीने आषाढी एकादशी वारीकरिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणार्या १ सहस्र ४०० दिंड्यांना प्रतिदिंडी २० सहस्र रुपये अनुदान वितरित करण्याविषयीचा आदेश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने काढण्यात आला. या अनुदानापोटी २ कोटी ८० लाख रुपये अनुदान वितरण करण्यास शासकीय मान्यता देण्यात आली आहे.
आषाढी वारीत पुणे महापालिकेची ‘सेवावारी’ !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महापालिकेने यंदा प्रथमच ‘सेवावारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वारकर्यांची सेवा, वारीच्या परंपरेचे जतन आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १० जुलैला रात्री ९ वाजता शहरात एकाच वेळी लाखो वारकरी आणि नागरिक ‘पसायदान’ म्हणणार आहेत, अशी माहिती महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनाढ्यांना मोहात पाडून त्यांना लुबाडणार्या संशयित महिलेला अटक
बेळगाव-गोवा मार्गावरील खानापूर ते अनमोडपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा रथ !
पावसाळ्यात झाडे पडणे, ही मानवनिर्मित आपत्ती ! – अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान
चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !
कारवाई न करणार्या शासकीय यंत्रणांना नागपूर खंडपिठाची नोटीस !