श्रीराममंदिरातील दान चोरीचे सीसीटीव्ही चित्रीकरण आले समोर !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या ‘पिलग्रिम फॅसिलिटी सेंटर’मधील ४५ दिवसांच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची पोलिसांनी कसून पडताळणी केल्यावर पैशांची मोजणी करणार्या ५ कर्मचार्यांनी नोटांचे बंडल काढून ते स्वतःच्या कपड्यांमध्ये किंवा सॉक्समध्ये लपवल्याचे उघड झाले. ‘दुर्दैवाने मंदिर प्रशासन ४५ दिवसांहून अधिक जुने सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करत नाही. त्यामुळे हा प्रकार कधीपासून चालू होता ?, हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही’, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले.
CCTV Captures Shri Ram Mandir Donation Theft
Shocking CCTV footage from Ayodhya's Shri Ram Mandir shows 5 employees entrusted with counting devotees' donations secretly stuffing bundles of cash into their clothes and even their socks.
Police have recovered ₹80 lakh from the… https://t.co/otfApRJeqc pic.twitter.com/4Vlql62ilD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 3, 2026
१. ज्या यंत्रणेद्वारे या कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्या यंत्रणेने या कर्मचार्यांची निवड तिने केली नसल्याचा दावा केला आहे. ज्या स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये दानाची रक्कम जमा केली जात होती, त्याच बँकेने या नियुक्त्यांसाठी या नावांची शिफारस केल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे.
२. आतापर्यंत पोलिसांच्या पथकाने आरोपींकडून ८० लाख रुपये जप्त केले आहेत. मंदिरात विविध दानपेट्यांमध्ये जमा झालेले पैसे मोजण्यासाठी न्यासाने ५० लोकांना कामावर ठेवले होते.
महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !
पॅरोल घेऊन पसार झालेल्या हत्येमधील आरोपीस ४ वर्षांनंतर अटक !
चंपत राय कारागृहात जाऊ शकतात ! – माजी खासदार विनय कटियार यांचा दावा
जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे !
४ सहस्र १२१ एकर इनाम भूमी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या नावे नसल्याने यात घोटाळा नाही !
E-Rickshaws : रस्त्यावरील ई-रिक्शा बंद पाडणारे चिनी ‘मोबाईल ॲप्स’ सरकारने हटवले !