
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथे पोलिसांनी राबवलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेच्या अंतर्गत भगवानगोला रेल्वेस्थानकाच्या परिसरातून ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व घुसखोर भारताच्या वेगवेगळ्या भागांत काम करत होते आणि गुप्त मार्गाने पुन्हा बांगलादेशात परतण्याच्या सिद्धतेत होते.
२. पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सर्वांना अटक करून कायदेशीर कारवाई चालू करण्यात आली आहे.
३. हे बांगलादेशी नागरिक भारतात कसे आले ?, येथे किती काळापासून रहात होते ? आणि त्यांना कोणी आश्रय दिला ?, या सर्व गोष्टींचा शोध अन्वेषण यंत्रणा घेत आहेत.
४. पोलीस अधिकार्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात एखाद्या मोठ्या अवैध घुसखोरी टोळीचे किंवा मानवी तस्करीचे जाळे कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच दिशेने या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड