पॅरोल घेऊन पसार झालेल्या हत्येमधील आरोपीस ४ वर्षांनंतर अटक !

(‘पॅरोल’ म्हणजे चांगल्या वर्तणुकीसाठी बंदीवानांना अटींवर काही दिवसांसाठी कारागृहाबाहेर सोडणे)

सातारा, ३ जुलै (वार्ता.) – भरत कांतीलाल ओसवाल हे हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होते. पॅरोल मिळाल्यावर ४ वर्षांपासून ते पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने १ जुलैला शाहूपुरी चौकातून ओसवाल यांना अटक केली. भरत ओसवाल हे हत्या आणि कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होते. १४ मे २०२० या दिवशी ते ४५ दिवसांच्या पॅरोलवर कारागृह बाहेर आले होता. कोरोनामुळे विशेष सवलतीद्वारे त्यांनी रजेचा कालावधी वाढवून घेतला; मात्र १९ मे २०२२ या दिवशी कारागृहात परत उपस्थित रहाणे त्यांना बंधनकारक होते, तरीही ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे ओसवाल यांच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आणि सापळा रचून अटक केली.

संपादकीय भूमिका

पसार झालेल्या आरोपीला शोधण्यासाठी ४ वर्षे लागणे, ही पोलीस प्रशासनाची निष्क्रीयताच !